ramdas kadam, yogesh kadam, raigad, ratnagiri, police, Saam TV
महाराष्ट्र

दीडशे फुटांपर्यंत खेचत नेले..., कार 360 डिग्री फिरल्यानंतर समाेर दरी..., अपघाताचा थरार सांगताहेत कदम (पाहा व्हिडिओ)

आमदार याेगशे कदम यांनी समर्थकांना काळजी करु नये असे आवाहन केले आहे.

साम न्यूज नेटवर्क

- जितेश काेळी, सचिन कदम

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्या गाडीला काल रात्री टँकरने ठोकर देऊन झालेला अपघात (MLA Yogesh Kadam Accident News) आता संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी रायगडचे जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे घटनेच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे. (Maharashtra News)

आमदार योगेश कदम यांच्या गाडीच्या पुढे व पाठीमागे पोलिसांचे वाहन असतानाही टँकरने पोलीस गाडीला ओव्हरटेक करून आमदारांच्या गाडीला पाठीमागून ठोकरले कसे, हा सर्व प्रकार संशयास्पद वाटताे. या अपघाताची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे, असे रामदास कदम (ramdas kadam) यांनी म्हटले आहे.

या अपघातानंतर टँकर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला आहे. तो अद्याप फरार आहे, त्यामुळेच हा अपघात (accident) नव्हे तर घातपात वाटत आहे असा संशय रामदास कदम यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे या घटनेची कसून चाैकशी व्हावी अशी मागणी त्यांनी पाेलिस विभागास केली आहे. दरम्यान आमदार याेगेश कदम यांनी देखील साम टीव्हीशी बाेलताना या घटनेची चाैकशी झाली पाहिजे असे नमूद केले.

अपघाताचा सर्व बाजुन तपास करणार : रायगड पोलिस अधिक्षक

आमदार योगेश कदम यांच्या अपघातग्रस्त वाहनाचा आणि घटनास्थळाची रायगडचे पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी आज पहाणी केली. यानंतर पत्रकारांशी बोलताना घार्गे यांनी या अपघाताचा सर्व बाजुने तपास केला जाणार असल्याचे सांगितले. अपघातग्रस्त डंपरचा चालक फरार असला तरी डंपरच्या मालकाकडे चौकशी सुरु केली आहे असेही पोलिस अधिक्षक घार्गे यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

W,W,W,W,W,W,W,W,W,W.. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजाने रणजी ट्रॉफीत राडा केला! Anshulने एकाच डावात घेतल्या 10 विकेट्स

Maharashtra News Live Updates: मविआचा मुख्यमंत्री विठ्ठलाच्या महापूजेसाठी येणार - जयंत पाटील

Abeer Gulal Serial: श्री पुन्हा अडकणार संकटात, शुभ्राचा कट यशस्वी; 'अबीर गुलाल' मालिकेत नवा ट्विस्ट

Garden: बगीचा सुंदर दिसण्यासाठी तुमच्या बागेत लावा ही ५ झाडे

Nashik News : नाशिकमध्ये मनसेला मोठा धक्का; माजी महापौर करणार ठाकरे गटात प्रवेश

SCROLL FOR NEXT