Ramdas Athawale  Saam Tv
महाराष्ट्र

Ramdas Athawale : '50 खोके एकदम ओके'वर रामदास आठवलेंची हटके कविता

आठवले यांनी या घोषणांवर कवितेच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली.

सचिन अग्रवाल, साम टीव्ही अहमदनगर

मुंबई : सध्या राज्यात विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवशेनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी शिंदे सरकारला धारेवर धरलं. 50 खोके, एकदम ओके… 50 खोके…आले आले… अशा घोषणा देत विरोधकांनी शिंदे सरकारला (Eknath Shinde) डिवचण्याचं काम केलं. त्यानंतर या घोषणांची संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा झाली. दरम्यान, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी या घोषणांवर कवितेच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली. (Ramdas Athawale Todays News)

काय म्हणाले रामदास आठवले?

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले नगरमध्ये होते. यादरम्यान, त्यांनी माध्यमांसोबत चर्चा केली. यावेळी पावसाळी अधिवेशनात 50 खोके बाकी सगळे ओके अश्या घोषणा दिल्या जात होत्या त्यावर तुमची प्रतिक्रिया काय? असा प्रश्न माध्यमांनी आठवले यांना विचारला. यावर आपल्या हटके स्टाईलने उत्तर देतांना आठवले यांनी कविता केली.

50 खोक्यांवर आठवले यांची कविता

रामदास आठवले म्हणाले की, '50 खोके बाकी सगळे ओके तुम्ही मारा छक्के... तुम्ही किती ही छक्के मारत असेल तरी त्या 50 खोक्यामध्ये काही अर्थ नाही' हे आमदार फुटले ते शिवसेनेच्या निर्णयाला कंटाळून फुटले आहेत. उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला काँग्रेस राष्ट्रवादीच्या दावणीला बांधल्यामुळे हे सगळे आमदार फुटलेले आहे. त्यामुळे अशा आरोपामध्ये तथ्य नाही. असं आठवले यांनी म्हटलं आहे. (Ramdas Athawale Lastest News)

रामदास आठवले शिर्डीतून निवडणूक लढवणार?

दरम्यान, आपण शिर्डी लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार का? असा प्रश्नही यावेळी आठवले यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना आठवले म्हणाले की, शिर्डीत मी लढलो होतो तेव्हा मला अपयश आलं होतं. अनेक लोकांचे फोन येताहेत, कार्यकर्त्यांची इच्छा आहे, आपण शिर्डीतून निवडणूक लढवावी. भाजपने आणि मित्रपक्षाने मदत केली तर मी विचार करेल. असं आठवले यांनी म्हटलं आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हनिमूनला जायचा विचार करताय का? भारतातील 'ही' ५ ठिकाणे आहेत प्रसिद्ध

Maharashtra News Live Updates: कार्तिकी यात्रेत विठ्ठल चरणी साडेतीन कोटींचे दान

लठ्ठपणामुळे मधुमेह होतो का? या दोघांमधील संबंध समजून घ्या...

Narayan Rane : महायुती आणि उद्धव ठाकरेंचे किती उमेदवार निवडून येतील? नारायण राणेंनी थेट आकडाच सांगितला

Diljit Dosanjh: दारूबंदी करा मग गाण्यांवर बंदी घाला, दिलजीत दोसांजचं सरकारच्या नोटिशीला उत्तर, काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT