Ramdas Athawale Latest News, Kolhapur, Sangamner Saam Tv
महाराष्ट्र

MP Ramdas Athawale News : हिंसाचारामागे पाकिस्तानचा हात : रामदास आठवले (पाहा व्हिडिओ)

कोल्हापुरातील हिंसाचाराच्या घटनेनंतर आठवलेंनी सामाजिक शांतता राखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत असे म्हटलं.

Siddharth Latkar

MP Ramdas Athawale News : मुस्लिम समाजाने औरंगजेबचा फाेटाे (Aurangzeb Photo Status) समाजात आणणे उचित नाही. त्यामुळे समाजात तेढ निर्माण हाेत आहे. दरम्यान राज्यातील शांतता बिघडविण्यात पाकिस्तानचा हात आहे की काय अशी शंका येत आहे. त्यामुळे अशा घटनांचा या दिशेने देखील सरकारने सखाेल तपास करावा अशी अपेक्षा खासदार रामदास आठवले यांनी पीटीआय या वृत्त संस्थेशी बाेलताना व्यक्त केली आहे. (Maharashtra News)

समाज माध्यमातून (social media) ठेवल्या जाणा-या वादग्रस्त स्टेटसवरुन संबंधितांवर कारवाई व्हावी या मागणीसाठी राज्यातील काेल्हापूरात बुधवारी हिंदुत्तववादी संघटनांनी आंदाेलन छेडले. या आंदाेलनकाळात हिंचाराची घटना घडली. त्यामुळे काेल्हापूरात बुधवारी दिवसभर तणावपूर्ण वातावरण हाेते. आज तेथील परिस्थिती पूर्वपदावर आली आहे.

या (kolhapur) घटनेची सखाेल चाैकशी झाली पाहिजे असे मत खासदार रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. परंतु राज्यात हाेत असलेल्या हिंसाचाराच्या घटनांमध्ये पाकिस्तानचा हात असू शकतो असेही आठवलेंनी नमूद केले. त्यादिशेने सरकारने तपास करायला हवा अशी अपेक्षा खासदार रामदास आठवलेंनी (Ramdas Athawale ) व्यक्त केली आहे.

आठवले म्हणाले मुस्लिम समाजाने औरंगजेबचा फाेटाे आणून शांतता बिघडविण्याचे काम करणे उचित नाही. जे दाेषी आहेत त्यांच्यावर कठाेर कारवाईची अपेक्षा आठवलेंनी व्यक्त केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway Jobs: १०वी, १२ वी पास तरुणांना रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज कसा करावा? जाणून घ्या

...तर वडिलांच्या मालमत्तेवर मुलीचा हक्क नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Suraj Chavan Dance: बिग बॉस फेम सूरजचा नाद नाय! 'तांबडी चामडी' गाण्यावर केला डान्स; Video व्हायरल

Maharashtra News Live Updates : कोल्हापुरात आतापर्यंत २० कोटींचा मुद्देमाल जप्त, 24 हजार संशयितांवर कारवाई

8th Pay Commission: केंद्रिय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! ८ व्या वेतन आयोगात किमान वेतन १८,००० नव्हे ३४५०० होणार

SCROLL FOR NEXT