Ramdas Athawale and Ambadas Danve surprise meeting in Shirdi latest news saam tv
महाराष्ट्र

केंद्रीय मंत्री अन् उद्धव ठाकरेंच्या विश्वासू नेत्याची भेट; राजकारणात घडामोडींना वेग

Ramdas Athawale And Ambadas Danve Surprise Meeting In Shirdi Latest News: केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आणि ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांची शिर्डीत अचानक भेट झाली. या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

Omkar Sonawane

सचिन बनसोडे, साम टीव्ही

केंद्रीय राज्यमंत्री आणि आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते तथा विधान परिषदेचे माजी विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची शिर्डीत भेट झाली. दोन्ही नेते शिर्डी दौऱ्यावर असताना शासकीय विश्रामगृहात ही भेट झाली. यावेळी रामदास आठवले आणि अंबादास दानवे यांनी एकमेकांची गळाभेट घेत संवाद साधला, वेगवेगळ्या राजकीय पक्षांत असलेल्या या दोन नेत्यांच्या भेटीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतल

दरम्यान या भेटीनंतर अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली. दानवे म्हणाले, श्रीरामपुरमध्ये गगनगीरी महाराज यांचा सप्ताह होता. त्यासाठी मी आलो होतो. त्यानंतर साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला आलो. तर रामदास आठवले यांच्या पक्षातील एका नेत्याचे निधन झाले होते म्हणून ते आले. यामुळे अचानक आमची शासकीय विश्रामगृहात भेट झाली. यामध्ये कुठलीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.

तर येणाऱ्या दोन ते तीन दिवसांत राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकते असे सूत्र सांगत आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि इतर खासदारांनी नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यावरून शरद पवार गट NDA सोबत सत्तेत जाणार असल्याच्या चर्चाना जोर आला होता. तर गेल्या काही दिवसांपासून शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्यात भेटीगाठी वाढल्या होत्या.

CJP चे आंदोलन सुरू असताना देखील शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.अलीकडेच पवार कुटुंबाच्या कौटुंबिक सोहळ्यात देखील PM मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी हजेरी लावल्याने राजकारणात चर्चा सुरू झाल्या होत्या. अशातच आज रात्री देखील मोठ्या राजकीय घडामोड घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kothimbir Vadi Recipe: जेवणासोबत खाण्यासाठी बनवा कुरकुरीत आणि चविष्ट कोथिंबीर वडी, वाचा सोपी रेसिपी

Walking 10,000 Steps Daily Benefits: सलग ३० दिवस रोज १०,००० पावले चालल्यास शरीरात काय बदल होईल?

विहिरीत पाणी नाही, चक्क पेट्रोल! सांगलीत खळबळ

राष्ट्रवादीकडून मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचा उमेदवार जाहीर; सुनेत्रा पवारांनी सतीश चव्हाणांना पुन्हा दिली संधी

गोकुळ निवडणुकीवरून राजकारण रंगलं, जागावाटपावरून महायुतीत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT