Uddhav Thackeray launches sharp attack on BJP over alleged misuse of Ram Temple funds, announces statewide ‘Ram Raksha’ protest. saam tv
महाराष्ट्र

'राम मंदिर पैशांचा वापर पक्षफोडीसाठी', उद्धव ठाकरेंचा भाजपवर मोठा आरोप, ठाकरेंचा भाजपविरोधात रामरक्षा आंदोलन

Ram Temple Theft Row Sparks Political War in Maharashtra: अयोध्येतील राम मंदिर चोरी प्रकरणावरून महाराष्ट्रातही राजकारण तापणार आहे. कारण ठाकरेसेनेनं भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. तसंच दिल्लीपासून गल्लीपर्यंत आंदोलनाचा इशाराही दिलाय. हे आरोप नेमके काय आहेत? भाजपला घेरण्यासाठी ठाकरेंनी कोणती नवी रणनीती आखलीय? त्यावरचा हा रिपोर्ट......

Saam Tv

अयोध्येतील राम मंदिर चोरी प्रकरणावरून राजकीय वातावरण तापलंय. राम मंदिर चोरी प्रकरणावरून विरोधकांनी सत्ताधारी भाजपविरोधात टीकेची झोड उठवलीये. अशातच आता राम मंदिर चोरी प्रकरणावरून उद्धव ठाकरेंनी खळबळजनक आरोप केलाय. राम मंदिरातील चोरीचा पैसा भाजपनं पक्षफोडीसाठी वापरल्याचा दावा ठाकरेंनी केलाय. तर दुसरीकडे, उद्धव ठाकरेंच्या आरोपांवर पलटवार करताना भाजपनं पक्षफुटीवरून ठाकरेसेनेला खोचक टोला लगावलाय.

राम मंदिर चोरीच्या मुद्द्यावरून ठाकरेसेनेनं भाजपला खिंडीत गाठण्याची रणनीती आखलीय. त्यासाठी उद्धव ठाकरेंनी आता थेट रामरक्षा आंदोलन सुरू करण्याची घोषणा केलीय. येत्या रविवारी ठाकरेसेनेकडून राज्यभरात 'रामरक्षा' आंदोलन करण्यात येणार आहे. मात्र या आंदोलनाची शिंदेसेनेनं खिल्ली उडवलीये..

पुढच्या वर्षी उत्तर प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे राम मंदिरावरून उत्तरप्रदेशात जोरदार राजकारण पेटलंय. मात्र आता याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रातही उमटू लागले असून उद्धव ठाकरेंना दीर्घ काळानंतर भाजपला कोंडीत पडकण्याची संधी आलीय. मात्र त्यांच्या या आंदोलनाला राज्यात कसा प्रतिसाद मिळणार आणि मविआतले मित्र पक्षही त्यांच्यासोबत उभे राहणार का? याची उत्सुकता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akshay Kumar: अक्षय कुमारने विकले मुंबईतील दोन आलिशान फ्लॅट; १२ कोटींपेक्षा जास्त झाला फायदा

Ketan Agarwal Case: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात खळबळजनक खुलासे, पोलिसांना सापडले पुरावे; सिया-चेतन करायचे कोड वर्डने चॅटिंग

केतनच्या हत्येचं बीड कनेक्शन उघड, केतन हत्या प्रकरणात तिसरा कोण?

आधी लग्न लपवलं, रहस्य उघडकीस आलं अन् प्रेयसीवर पेट्रोल ओतून जिवंत जाळलं, क्रूर कृत्याने संतापाची लाट

MPSC Recruitment: MPSC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, ग्रुप-सीच्या २,६१९ पदांसाठी बंपर भरती; कुठे अन् कसा कराल अर्ज?

SCROLL FOR NEXT