Ram Satpute Saam TV
महाराष्ट्र

Ram satpute : 'सरकार आपलं, एका वर्षात मोहिते पाटलांना तुरूंगात टाकणार, राम सातपुते नाव‌ लावणार नाही'

Ram Satpute Markadwadi Solapur Malshiras : माळशिरसमधील मारकडवाडीमध्ये राम सातपुते यांनी मोहिते पाटील यांना इशाराच दिला आहे. वर्षभरात तुरूंगात टाकू, असे राम सातपुते म्हणालेत.

Namdeo Kumbhar

Ram satpute On mohite Patil : मोहिते पाटील यांनी बँका, पतसंस्था बुडवल्या आहेत. आता विनंती करण्याचे, सूचना करण्याचे दिवस गेले आहेत. आता सरकार आपलं आहे. मोहिते पाटील यांना वर्षभरात तुरूंगात टाकणार आहे. तुरूंगात टाकलं नाही तर राम सातपुते नाव लावणार नाही, असे निर्धार माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांनी केलाय. ते मारकडवाडी येथे बोलत होते.

मारकडवाडी सध्या महाराष्ट्राच्या राजकारणातील चर्चेचा विषय ठरत आहे. शरद पवार यांच्यानंतर राम सातपुते, सदाभाऊ खोत आणि गोपिचंद पडळकर यांनी आज मारकडवाडीला भेट दिली. आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांची बैलगाडीतून गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. मारकडवाडी ग्रामस्थांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलं.

राम सातपुते काय म्हणाले ?

मोहिते पाटील यांच्या गुंडांनी रस्त्यावर साखर कारखान्याची माणसं उभी केली आहेत. येथील विरोधकांना गुडघ्यावर आणण्याचे काम केले. मोहिते पाटील यांच्या गुंडांनी कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या. सोनाली शिरतोडे यांचा सत्कार सभेला मारकडवाडीतील दहा महिला व पाच पुरुष उपस्थित होते. जयसिंह मोहिते पाटील यांना आपल्या मुलाला निवडून आणता आलं नाही ते आता मतांची बेरीज करत आहेत, असा टोला राम सातपुते यांनी लगावला.

मारकडवाडी या गावाचा डीएनए भाजपचा आहे. मोहिते पाटील यांनी या माळशिरस तालुक्याचे वाटोळे केले. तालुक्यातील जनतेचं रक्त पिले. राम सातपुते यांचं घर विकत घेणारी औलाद जन्माला यायची आहे, असा निशाणा सातपुते यांनी केली.

अकलूजचा पुढचा नगराध्यक्ष भाजपचा असेल. सहा महिन्यात सदाशिव नगर येथील साखर कारखान्यावर प्रशासक येईल. मोहिते पाटील आणि जानकर यांचे चार कार्यकर्ते म्हणजे मारकडवाडी गाव‌ होत नाही, असा टोला लावतानाच राम सातपुते यांची जीभ घसरली.

रणजितसिंह यांच्यावर पुन्हा निशाणा -

रणजितसिंह मोहिते आता भाजप नेत्यांच्या घरापुढे नाक घासत आहेत. जनाची नाही तर मनाची लाज असेल तर रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा. गद्दारी करणाऱ्या मोहिते पाटील यांना थारा देऊ नका, माफ करू नका. रणजितसिंह मोहिते पाटील यांची लवकर हकालपट्टी झाली नाही तर भाजपचे कार्यकर्ते रक्ताने पत्र लिहितील, असा इशारा यावेळी राम सातपुते यांनी दिला.

... तर राजकारण सोडेल

जिल्हा परिषद निवडणुकीत मोहिते पाटील यांच्या खोडांना तरूण पोरं पाडतील. मोहिते पाटील यांच्या नाकावर टिच्चून एक लाख आठ हजार मत घेतली आहेत. मी लढणारा कार्यकर्ता आहे. 2029 ला इथं भाजपचा आमदार असेल. या पुढच्या काळात गुलाल उधळला नाही तर राम सातपुते राजकारण थांबवेल, असे राम सातपुते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: विठ्ठलाची पदस्पर्श दर्शन रांग गोपाळपूरपर्यंत जाऊन पोहोचली

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् फक्त व्याजातून दर महिन्याला मिळवा ५५०० रुपये

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

SCROLL FOR NEXT