Ram Temple Inauguration Saam TV
महाराष्ट्र

Ram Temple Inauguration: विद्युत रोषणाई, बाईक रॅली अन् भव्य रांगोळी; रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी संपूर्ण राज्यात जल्लोष, VIDEO

Ruchika Jadhav

Ram Mandir inauguration celebration in maharashtra

संपूर्ण देशभरात राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. राज्यात देखील विविध ठिकाणी आपआपल्या पद्धतीने प्रभू श्री रामाबद्दल प्रेमभावना व्यक्त करत आनंद साजरा केला जातोय. अशात राज्यात ठिकठिकाणी कशा पद्धतीने या सोहळ्याचा उत्सव साजरा होत आहे याबाबत माहिती जाणून घेऊ.

८ कडधान्यांचा वापर करून सुरेख श्रीराम प्रभूंची रांगोळी

बीडच्या आष्टी येथील श्रध्दा नवनाथ ससाणे या मुलीने आपल्या घरी ८ कडधान्यांचा वापर करून सुरेख अशी श्रीराम प्रभूंची रांगोळी रेखाटली आहे. ही रांगोळी १० बाय १२ साईजमध्ये आहे. तर यासाठी ६ किलो कडधान्य वापरुन रांगोळी तयार केली आहे. रांगोळी तयार करण्यासाठी श्रद्धा ससाणेला दोन दिवस कालावधी लागला आहे. दरम्यान विविध कडधान्यांमधून ही रांगोळी रेखाटली असून प्रभू रामचंद्र यांचा डोक्यावरील मुकूट तसेच धनुष्यबाण हे हूबेहूब रेखाटले आहेत.

सायनमधील आनंद दळवी मैदानात 100 बाय 100 फूट रांगोळी

अयोध्येत प्रभू श्रीरामाची आज प्राणप्रतिष्ठा होणार आहे. याच प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने देशभरात आज जल्लोषचे आणि उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. या कार्यक्रमानिमित्त सायनमधील आनंद दळवी मैदानात 100 बाय 100 फूट रांगोळीच्या माध्यमातून रामाची भव्य अशी परिकृती साकारण्यात येणार आहे. यात 950 किलो रांगोळी लागली असून विविध रंग छटा वापरून ही रांगोळी तयार करण्यात येणार आहे . ही रांगोळी प्रेक्षकांसाठी 22 जानेवारी ते 26 जानेवारी सकाळी 10 ते सायंकाळी 10 वाजेपर्यंत खुली करण्यात आली आहे.

यवतमाळात रामभक्तांनी काढली मोटरसायकल रॅली

प्रभू श्रीराम यांच्या अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्याने आज सकाळपासून यवतमाळ शहरात ठिकठिकाणी रामभक्तांनी मोटरसायकल रॅली काढली. यावेळी रॅलीत रामभक्तांनी हातात भगवे ध्वज घेऊन जय श्रीरामच्या घोषणेने शहर दुमदुमून गेले. श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उत्साह चिमुकल्या मुलांपासून, तरुणाई आबालवृद्ध मंडळी पर्यंत दिसून आला. डीजेवर केवळ श्रीराम यांच्याच गाण्याची धूम ऐकायला मिळाली. रस्त्याने जाताना प्रत्येकाच्या हातात भगवे ध्वज दिसत होते.

डोंबिवलीतील श्रीराम मंदिरात मनसेकडून महाआरती

अयोध्येत श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापनाच्या पार्श्वभूमीवर आज देशभरात उत्साहात वातावरण दिसून येतेय . डोंबिवलीमध्ये मनसेकडून बाजीप्रभू चौकातील श्रीराम मारुती मंदिरात महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं. या महाआरतीत मनसे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसह शेकडो डोंबिवलीकरांनी सहभाग घेतला होता. आरतीनंतर जय श्रीरामच्या घोषणेने परिसर दणाणून गेला होता.

वाशीमच्या अभिषेकने केळीच्या पानावर साकारलं श्रीरामाचं रूप

वाशिमच्या मातोश्री शांताबाई गोटे महाविद्यालयाच्या अभिषेक आत्माराम जाधव या विद्यार्थ्यानं आज अयोध्येत होत असलेल्या प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर केळीच्या पानावर प्रभू श्री रामचं चित्र कोरलय. त्याच्या या कलेचं सर्वत्र चौतुक होतंय. अभिषेकनं याआधी पिंपळाच्या व केळीच्या पानावर सुद्धा अनेक देव, देवी व महापुरुषांची चित्रे कोरली आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tip: सतत घाम येतोय? आहारात करा 'हा' छोटा बदल!

Accident News: चालकाचे नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात.. आधी महिलेला धडक, नंतर कार थेट दुकानात , १ गंभीर जखमी

Viral Video: तरुणांना चढला नवरात्रीचा फिवर, ''जय माता दी'' म्हणत दिल्ली मेट्रोमध्ये गायलं गाणं; व्हायरल VIDEO ची जोरदार चर्चा

Akola News : संतापजनक! निर्दयी बापाने 2 चिमुकल्या मुलींना नदीत फेकलं; मन सुन्न करणारी घटना, आरोपीला अटक

Lakshmi Narayan Rajyog: ४ दिवसांनी तूळ राशी बनणार लक्ष्मी नारायण योग; 'या' राशींच्या संपत्तीत होणार वाढ

SCROLL FOR NEXT