Raksha Bandhan Cash Back Fact Check saam tv
महाराष्ट्र

Raksha Bandhan : सरकारकडून रक्षाबंधनाला 2 हजारांचं गिफ्ट? लाडकींना रक्षाबंधनाला कॅशबॅक मिळणार?

Fact Check : रक्षाबंधनासाठी सरकार 2 हजारांचं गिफ्ट देणार आहे...होय, असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय...एक लिंक देण्यात आलीय...त्यावर क्लिक केल्यावर पैसे मिळतात असा दावा केलाय...त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी केली...मग काय सत्य समोर आलं पाहुयात...

Sandeep Chavan

Fact Check News : रक्षाबंधनाला आता सरकार 2 हजार रुपयांचं कॅशबॅक देणार असल्याचा दावा करण्यात आलाय...हा मेसेज प्रचंड व्हायरल होत असून, त्यासोबत एक लिंकही देण्यात आलीय...पण, खरंच सरकार रक्षाबंधनासाठी 2 हजारांचं गिफ्ट देणार आहे का...? पैसे मिळणार असतील तर त्यासाठी काय नियम आहेत...? याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे...त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...

रक्षाबंधन कॅशबॅक योजना सुरू झालीय. तुम्हाला आलेल्या लिंकला क्लिक केल्यास सरकार 2 हजार रुपये कॅशबॅक देईल.

हा मेसेज आणि यासोबत असलेली लिंक व्हायरल होतेय...रक्षाबंधन असल्याने अनेकांनी ही लिंक उघडूनही पाहिली...मात्र, पैसे कधी मिळणार...? हे सांगितलेलं नाही...त्यामुळे आमच्या व्हायरल सत्य टीमने याची सत्यता जाणून घेण्यासाठी पडताळणी सुरू केली...याबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी आम्ही ही लिंक उघडून पाहिली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

व्हायरल सत्य - साम इन्व्हिस्टिगेशन

  • रक्षाबंधनासाठी कॅशबॅक सरकारची योजना नाही

  • लिंकच्या माध्यमातून फसवणूक करण्याचा डाव

  • कोणत्याही लिंकला क्लिक करू नका

  • फसवणूक झाल्यास 1930 हेल्पलाईनवर कॉल करा

  • cybercrime.gov.in पोर्टलवर ऑनलाईन तक्रार करा

तुम्हालाही असा कोणताही मेसेज आला तर विश्वास ठेवू नका...कारण, फसवणूक करण्यासाठी असे मेसेज व्हायरल करून दिशाभूल केली जाते...त्यामुळे आमच्या पडताळणीत सरकारकडून रक्षाबंधनाला 2 हजारांचं गिफ्ट मिळणार असल्याचा दावा असत्य ठरलाय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नंदुरबार शहरात आजपासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

FIFA World Cup 2026 : ४८ संघ, १६ शहरं आणि १०४ सामने...कोण ठरणार विश्वविजेता? चक्रावून टाकणारा अंदाज

Thalapathy Vijay Family Photo: तमिळनाडूचे मुख्यमंत्री थलापती विजय यांच्या कुटुंबात कोण कोण आहे? जाणून घ्या त्यांच्या परिवाराविषयी

Breaking : कॅबिनेट मंत्री सुधाकर यांचे निधन; फुफ्फुसाच्या संसर्गाशी झुंज ठरली अपयशी, राजकीय वर्तुळावर शोककळा

Cancer Risk: उशिरा गर्भधारणा केल्याने वाढतो 'या' कॅन्सरचा धोका, डॉक्टरांनी सांगितली लक्षणं अन् उपाय

SCROLL FOR NEXT