Five senior leaders from Thackeray Sena emerge as contenders for a single Rajya Sabha seat amid growing political competition within Maha Vikas Aghadi. Saam Tv
महाराष्ट्र

राज्यसभेच्या उमेदवारीसाठी मातोश्रीवर फिल्डिंग, कोणाला मिळणार संधी?

Race for Rajya Sabha: राज्यसभेच्या एका जागेसाठी ठाकरेसेनेत पाच दावेदार असल्याची चर्चा रंगलीय. हे पाच दावेदार कोण आहेत? दुसरीकडे महाविकास आघाडीतही राज्यसभेवरुन कशी रस्सीखेच रंगलीय ?

Suprim Maskar

महाविकास आघाडीत राज्यसभेवरून रस्सीखेच सुरु असताना आता ठाकरसेनेतच उमेदवारीसाठी चुरस पाहायला मिळालीय...एकीकडे राज्यसभेसाठी शरद पवारांच्या नावावर चर्चा सुरू असताना दुसरीकडे उमेदवारी मिळवण्यासाठी ठाकरेसेनेचे पाच बडे नेते रिंगणात उतरलेत..

ठाकरेसेनेच्या विद्यमान खासदार प्रियंका चतुर्वेदी पुन्हा उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील... लोकसभा आणि विधानसभेतील पराभवानंतर राजन विचारेंचीही राज्यसभेसाठी फिल्डिंग...विधान परिषदेचा कार्यकाळ संपल्यानं अंबादास दानवेंकडूनही राज्यसभेसाठी प्रयत्न.. लोकसभेतील पराभवानंतर कोकणातील वर्चस्व टिकवण्यासाठी विनायक राऊतही राज्यसभेसाठी आग्रही...माजी खासदार चंद्रकांत खैरेही राज्यसभेसाठी इच्छुक..

दरम्यान ठाकरेसेनेत राज्यसभेसाठी अनेक जण इच्छुक असल्याची कबुली राऊतांनी दिलीय...दुसरीकडे राज्यसभा उमेदवारीबाबत शरद पवार यांनी अद्याप मौन बाळगलंय. स्वतःच्या उमेदवारीचा निर्णय त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सोपवला असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. मात्र यासंदर्भात मविआतील प्रमुख नेत्यांची बैठक झाल्याचं सांगून मविआतील घटकपक्षांमध्ये राज्यसभेसाठी इच्छुक उमेदवारांची भाऊगर्दी असल्याचं शशिकांत शिंदेंनी सांगितलयं...

राज्यसभेसाठी शरद पवारांचा निर्णय काय असेल? याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष असणार आहे. मात्र राज्यसभेच्या एका जागेवरून सुरू झालेली ही रस्सीखेच महाविकास आघाडीतील ऐक्याची कसोटी पाहणारी आहे. त्यात मविआतील मोठा पक्ष म्हणून ठाकरसेनेच्या वाट्याला राज्यसभेची जागा आल्यास पक्षातील पाच इच्छुकांपैकी कोणाला संधी द्यायची, याचं आव्हान ठाकरसेनेपुढे असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: लखनौचा दणदणीत विजय; चौधरीच्या फटकेबाजीत कोलकाता ढेर,KKRला रडवणारा मुकूल चौधरी आहे तरी कोण?

Jal Jeevan Mission scam: 960 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी माजी IAS अधिकाऱ्याला अटक; ACB ची मोठी कारवाई

जगाच्या नकाशावर आणखी एका देशचा उदय होणार? इराण-अमेरिका युद्धादरम्यान मोठी घडामोड

केरळमध्ये डावे हरले तर देशातून 'कम्युनिस्ट सरकार' पूर्णपणे संपणार?

इराण मुस्लीम देशांचा नवा लीडर? आखाती युद्धामुळे बदलणार गणित?

SCROLL FOR NEXT