मुंबई : राज्यसभा निवडणुकीचे मतदान सुरू असताना राष्ट्रवादी (NCP) कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे. अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि नवाब मलिक यांना मतदानाची परवानगी नाकारण्यात आली आहे. हायकोर्टाने अनिल देशमुख यांची सुनावणी घेण्यास नकार दिला तर, मलिकांची (Nawab Malik) याचिका चुकीची असल्याचं म्हटलं आहे. मंत्री नवाब मलिक यांची याचिका चुकीची असून, त्यांना मतदानाची तूर्तास परवानगी देता येणार नसल्याचे हायकोर्टाने स्पष्ट केलं आहे. (NCP Nawab Malik And Anil Deshmukh Latest News)
मलिक यांच्या मतदानासंदर्भात मुंबई सत्र न्यायालयानं दिलेला निकाल हायकोर्टाकडून कायम ठेवण्यात आला. मात्र, असं असलं तरी, नवाब मलिक यांच्या वतीने याचिकेत सुधारणा करून पुन्हा याचिका दाखल करणार असल्याची माहिती मिळते आहे. याचिकेतील जामीनाचा मुद्दा काढून केवळ बंदोबस्तात मतदानाची परवानगी देण्याची मागणी मलिक यांच्याकडून करण्यात येणार आहे. या याचिकेवर आता थोड्यावेळात नव्या याचिकेसह पुन्हा सुनावणी होणार आहे. (Rajysabha Election 2022 News)
राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी विशेष न्यायालयाने गुरुवारी परवानगी नाकारल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी तात्काळ उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तसेच मतदानासाठी आपल्याला एक दिवसाचा जामीन मंजूर करावा किंवा पोलीस बंदोबस्तात विधानभवनात नेण्यात यावे, अशी मागणी केली होती. हे मतदान शुक्रवारीच होणार असल्याने याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची देशमुख-मलिक यांची विनंतीही न्यायालयाने मान्य केली होती.
आज या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी झाली. हायकोर्टाने अनिल देशमुख यांची सुनावणी घेण्यास नकार दिला. तर, मंत्री नवाब मलिक यांची याचिका चुकीची असून, त्यांना मतदानाची तूर्तास परवानगी देता येणार नसल्याचे हायकोर्टाने स्पष्ट केलं आहे. दरम्यान, दुपारी चार वाजेपर्यंत राज्यसभेच्या निवडणुकीचं मतदान सुरू राहणार आहे. दरम्यान, नव्याने अर्ज करून नवाब मलिक यांच्या मागणीवर सुनावणी केली जाईल, असं हायकोर्टानं म्हटलं आहे. त्यामुळे नवाब मलिक पुन्हा याचिका करून मतदान करण्याची परवानगी मिळवणार का हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.