Prashant Jorgewar Saam Tv
महाराष्ट्र

घोडेबाजार शब्दावर अपक्ष आमदार संतापला; प्रतिमा खराब होत असल्याने तक्रार करणार

दोन्ही बाजूंनी एकमेकांवर घोडेबाजार करत असल्याचा आरोप देखील केला जात आहे

संजय तुमराम

चंद्रपूर : राज्यात सध्या राज्यसभेच्या निवडणुकीवरून (Rajya Sabha Election) राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. निवडणूक बिनविरोध होणार असल्याचं स्पष्ट होताच सत्ताधारी (Mahavikas Aghadi) आणि विरोधकांकडून (BJP) राज्यसभेची सहावी जागा जिंकण्यासाठी दोन्ही बाजूंनी ताकद लावली जात आहे. इतकंच नाही तर, दोन्ही बाजूंनी एकमेकांवर घोडेबाजार करत असल्याचा आरोप देखील केला जात आहे. अशातच 'घोडेबाजार' या शब्दावर चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार (Prashant Jorgewar) यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. (Rajya Sabha Election 2022 latest News)

'घोडेबाजार' हा शब्द नेत्यांकडून वारंवार वापरला गेल्यास अपक्ष आमदारांना "वेगळा विचार करावा लागेल", असा इशाराही त्यांनी दिला आहे. अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या बाबतीत अशी शंका घेणे चूक-महापाप असून, घोडेबाजार हा शब्द वापरल्याने मतदारसंघात आमची प्रतिमा खराब होते, असे किशोर जोरगेवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, याबाबत मुख्यमंत्री आणि विधानसभा उपाध्यक्ष यांच्याकडे तक्रार करणार असल्याची माहिती देखील जोरगेवार यांनी दिली. शिवसेनेचे काही नेतेही या शब्दाचा वारंवार उल्लेख करीत आहेत. विशेष म्हणजे किशोर जोरगेवार यांनी शिवसेना उमेदवार संजय पवार यांच्या उमेदवारी अर्जावर अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केली आहे.

दरम्यान, विधानसभेतील संख्याबळानुसार महाविकास आघाडीला चौथा उमेदवार निवडून आणण्याकरिता 15 तर भाजपला 20 मतांची आवश्यकता आहे. छोटे पक्ष व अपक्ष अशा 29 मतांवर शिवसेना व भाजपची भिस्त असेल. यातूनच ‘घोडेबाजार’ म्हणजेच आमदारांना वश करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. यातूनच भाजप की शिवसेनेचा अतिरिक्त उमेदवार पराभूत होतो वा काँग्रेसला फटका बसतो याची उत्सुकता असेल.

विधानसभेतील संख्याबळाच्या आधारे शिवसेना 55, राष्ट्रवादी 53 आणि काँग्रेस 44 अशी महाविकास आघाडीतील तीन घटक पक्षांची 152 मते आहेत. भाजपचे 106 आमदार आहेत. अपक्ष आणि छोट्या पक्षांचे 29 आमदार आहेत.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कराडमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांकडून निषेध

Assembly Election: बल्लारपूरमध्ये रंगणार तिरंगी लढत; सुधीर मुनगंटीवारांपुढे काँग्रेसच्या संतोष सिंह रावतांचं आव्हान

IND vs SA: निर्णायक सामन्यात टीम इंडियाचा टॉस जिंकत बॅटिंगचा निर्णय; पाहा प्लेइंग 11

World : जगातील सर्वात मोठे नदी बेट कोणते? हनिमूनसाठी सर्वात रोमँटिक ठिकाण

School Holiday Update: शाळांना खरंच सलग ३ दिवस सुट्टी? शिक्षण आयुक्त म्हणाले, सरसकट नाहीच!

SCROLL FOR NEXT