Raju Shetti, Eknath Shinde, devendra fadnavis, Maharashtra Budget 2023 Saam TV
महाराष्ट्र

Raju Shetty News: 'राज्यातील शेतकरी घेवून...' बारसू रिफायनरी प्रकल्पावरुन राजू शेट्टींचा सरकारला इशारा

Raju Shetty On Barsu Refinery Protest: दडपशाहीचा मार्ग अवलंबाल तर हे प्रकरण महागात पडेल," असा इशाराही शिंदे फडणवीस सरकारला दिला आहे..

Gangappa Pujari

रणजित माजगावकर, प्रतिनिधी...

Ratnagiri Barsu Refinery News: रिफायनरी प्रकल्पाला (Refinary Project) सलग दोन दिवसांपासून नागरिक विरोध करत आहेत. बारसू येथे कालपासून नागरिकांनी ठिय्या मांडला आहे. यात महिला वर्ग मोठ्या प्रमाणावर सहभागी झाला आहे. मात्र आता पोलिस आणि आंदोलक यांच्यात बाचाबाची होउन हे प्रकरण चिघळल्याचे दिसत आहे.

या सर्व परिस्थीतीवर राज्याचे राजकारणही (Maharashtra Politics) चांगलेच तापले असून हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी होताना दिसत आहे. याच मुद्द्यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनीही शिंदे- फडणवीस सरकारला इशारा दिला आहे..

काय म्हणाले राजू शेट्टी...

"कोकणात होणारा रिफायनरी प्रकल्प शेतकऱ्यांनी हाकलून लावल्यानंतर बारसूमध्ये हा प्रकल्प लादण्याचा प्रयत्न केली जात आहे. याठिकाणीही स्थानिकांचा, शेतकऱ्यांचा प्रकल्पाला तीव्र विरो असूनही दडपशाहीच्या मार्गाने हा प्रकल्प करण्याचा घाट घातला आहे, यामागे कोणाचा हात आहे?" असा सवाल राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी उपस्थित केला आहे.

तसेच याबद्दल पुढे बोलताना, "महिला, पुरूष सर्वजण या आंदोलनात उतरले असताना दडपशाहीचा वरंवटा फिरवून माती परिक्षण करण्याचा घाट पोलिसांनी का घातला आहे, पोलिसांना यामध्ये इतका रस का?" असेही ते यावेळी म्हणाले..

शिंदे- फडणवीस सरकारला दिला इशारा...

यावेळी राजू शेट्टी यांनी "बारसू प्रकल्प लादण्याचा प्रयत्न कराल तर याद राखा, संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी घेवून आंदोलकांसोबत उभा राहीन; स्थानिकांचा विरोध असेल तर हा प्रकल्प होऊ देणार नाही, त्यामुळे दडपशाहीचा मार्ग अवलंबाल तर हे प्रकरण महागात पडल्याशिवाय राहणार नाही," असा इशाराही शिंदे फडणवीस सरकारला दिला आहे.. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शनिशिंगणापूर देवस्थानचे माजी विश्वस्तांनी उचललं टोकाचं पाऊल; घरातच गळफास घेत आयुष्य संपवलं

Rave Party : खराडी रेव्ह पार्टी प्रकरणात मोठी अपडेट, खडसेंच्या जावायाचा अल्कहोल रिपोर्ट समोर

Maharashtra Live News Update: उद्या दुपारी होणार राज्य मंत्रिमंडळाची बैठक

Crime: तिला मारून टाक, तुझं दुसरं लग्न करू; सोशल मीडियावर VIDEO पोस्ट करत पोलिसाच्या बायकोची आत्महत्या

Farmer Success Story : लातूरच्या मातीत विदेशी फळ; शेतकऱ्याचा प्रयोग यशस्वी, वर्षाकाठी घेताय एकरी १२ लाखाचे उत्पादन

SCROLL FOR NEXT