Raju Shetti 
महाराष्ट्र

शेतकरी विरोधी सरकारला गुडघे टेकायला लावू : राजू शेट्टी

विजय पाटील

उत्पादन पेक्षा कमी किमतीत शेतीमाल विकला जात आहे. तर दुसरीकडे कर्जाचा डोंगर आणि बँकांचा तगादा यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. हे चित्र बदलायचे असेल तर शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे असेही राजू शेट्टींनी नमूद केले.

सांगली : एक रकमी एफआरपी वर आम्ही ठाम आहाेत. परंतु केंद्र सरकारने एफआरपी frp तीन तुकड्यात देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यावर कळस म्हणजे राज्य सरकार वर्षभरात तीन तुकड्यात एफआरपी देऊ असे म्हणत आहे. खरं तर ही दोन्ही सरकार शेतकऱ्याच्या विरोधात आहेत. आम्ही यांना गुडघे टेकायला लावू असा इशारा देत एक रकमी एफआरपी घेऊ असा विश्वास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी Raju Shetti यांनी केंद्र आणि राज्य सरकारला दिला. सांगली येथे आज एका शेती विषयक कंपनीच्या उदघाटनास शेट्टी आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

शेट्टी म्हणाले सव्वा दोन महिने उलटून गेले अद्यापही पूरग्रस्तांना सरकारने मदत दिली नाही. आता केंद्र सरकारचे पथक महाराष्ट्रात येणार आहे. मला कळत नाही आता येऊन हे पथक काय पाहणार आहे. या सर्व गाेष्टीवरून कळते केंद्र सरकारला शेतकऱ्यांच्या विषयी किती तळमळ आहे.

राज्य सरकारची अद्यापही काही ठिकाणी मदत पोहचली नाही. आम्ही यासाठी जल समाधी आंदोलन सुद्धा केले. अजून काय करायचे तेव्हा सरकार मदत करणार असा प्रश्न शेट्टी यांनी राज्य सरकारला केला आहे. शेतकरी आणि पूरग्रस्तांना तातडीने मदत मिळाली नाही तर महाविकास आघाडीतील नेत्यांची दिवाळी गाेड लागू देणार नाही असा इशारा शेट्टींनी दिला. 

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sonam Wangchuk: 'अन्यायापासून ते मुक्तीपर्यंत...' सोनम वांगचुक यांचा रुग्णालयातून पहिला मेसेज, २० जुलैसाठी देशवासियांना आवाहन

Maharashtra News Live Update: हायकोर्टाचा दणका अन् पोलिसांचा अॅक्शन मोडवर, शास्त्रीनगर मारहाण प्रकरणातील पाचवी महिला आरोपी अटकेत

8th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! पगार, DA आणि पेन्शनमध्ये होणार मोठा बदल

Health Tips After 40: वयाच्या 40 नंतर या 8 सवयी लगेचच बदला; अन्यथा आरोग्यावर होऊ शकतो गंभीर परिणाम

Jennifer Winget चा पती William Ishmael आहे तरी कोण? घटस्फोटानंतर १२ वर्षांनी अभिनेत्रीने थाटला दुसरा संसार

SCROLL FOR NEXT