CM Eknath Shinde, Raju Shetty, kolhapur Saam tv
महाराष्ट्र

Raju Shetti News: तुम्हाला गुडघे टेकायला लावल्याशिवाय शेतकरी मागे हटणार नाही; कांदाप्रश्नी राजू शेट्टींचा सरकारवर हल्लाबोल

Raju Shetti On Onion Export Duty: सरकारने त्यांना वाऱ्यावर सोडलं. एकीकडे अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं. त्यामुळे शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक राहिलेला नाही.

Ruchika Jadhav

विजय पाटील

Onion Export Duty:

कांद्यावरची निर्यात बंदी हा सरकारचा मूर्खपणा आहे. गेल्या 23 तासांपासून आंदोलन सुरूच आहे. मात्र सरकार लक्ष घालायला तयार नाही, अशा शब्दांत स्वाभिमानी शेतरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सरकरावर टीकास्त्र सोडलं आहे. कोल्हापूर जिल्ह्याप्रमाणे सांगली जिल्ह्यात उसाला दर मिळावा यासाठी कालपासून सांगलीच्या वसंतदादा साखर कारखान्यासमोर राजू शेट्टी यांचे आंदोलन सुरू आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आंदोलनाला आता 23 तास उलटून गेलेत. आंदोलन (Protest) सुरू असल्याने परिसरातील वाहतूक ठप्प आहे. मला आश्चर्य वाटते सरकार आणि प्रशासन काहीच करत नाहीत. जिल्हाधिकारी पत्र देत नाहीत. ते साखर कारखान्याच्या टोळीत सामील झाले आहेत का?, अशा शब्दांत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सवाल केलाय.

कांद्यावरची निर्यात बंदी हा सरकारचा मूर्खपणा आहे

माध्यमांशी संवाद साधताना राजू शेट्टी पुढे म्हणाले की, कांद्यावरची निर्यात बंदी हा सरकारचा मूर्खपणा आहे. जेव्हा कांद्याला दर नव्हता त्यावेळी कांदा रस्त्यावर फेकला जात होता. त्यावेळेस सरकारने त्यांना वाऱ्यावर सोडलं. एकीकडे अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं. त्यामुळे शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक राहिलेला नाही.

सरकारला गुडघे टेकायला लावल्याशिवाय शेतकरी मागे हटणार नाही

जो काही थोडाफार कांदा शिल्लक राहिलेला आहे, तो विकून खराब झालेल्या कांद्याचे नुकसान भरून काढायचे असताना शेतकऱ्याला सरकारने वाऱ्यावर सोडालं आहे. शेतकऱ्यांना चार पैसे मिळत असतील तर सरकार आडवं का येतं? त्यामुळे शेतकरी रस्त्यावर उतरलाय आणि सरकारला गुडघे टेकायला लावल्याशिवाय शेतकरी मागे हटणार नाही, अशा शब्दांत राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! विजयाच्या मेळाव्यानंतर राजकीय घडामोडींना वेग; ठाकरे गटाकडून भाजपच्या मोठ्या नेत्याला ऑफर?

IND vs ENG 2nd Test Score: शुबमनकडून इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई; दुसऱ्या डावातही ठोकलं शतक

India Bangladesh Tour: टीम इंडियाचा बांगलादेश दौरा का झाला रद्द? काय आहे कारण,जाणून घ्या

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

SCROLL FOR NEXT