Pune : "हर्बल तंबाखूचा पहिला प्रयोग सदाभाऊ खोत यांनी आपल्या शेतात करावा" SaamTvNews
महाराष्ट्र

Pune : "हर्बल तंबाखूचा पहिला प्रयोग सदाभाऊ खोत यांनी आपल्या शेतात करावा"

स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रमुख मा.खासदार राजू शेट्टी व साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील साखर कारखाने व एफआरपी बाबत चर्चा संपन्न झाली.

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

पुणे : स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रमुख मा.खासदार राजू शेट्टी व साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील साखर कारखाने व एफआरपी बाबत चर्चा संपन्न झाली.

या नंतर शेट्टी यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. १९ ऑक्टोबर ला कोल्हापुरातील जयसिंगपूर येथे स्वाभिमानीची ऊस परिषद झाली. त्यात जे काही ठराव संमत झाले, त्याची प्रत साखर आयुक्तांना देण्यात आल्याचे शेट्टी यांनी सांगितले. राज्यातील सर्व साखर कारखान्यांनी एक रक्कमी एफआरपी द्यावी, डिसेंबर मध्ये तीन हजार तीनशे व राहिलेली रक्कम जानेवारी पर्यंत द्यावी. अश्या मागण्या आयुक्तांकडे करण्यात आल्या आहेत. तसेच तुकड्या तुकड्यात FRP ची रक्कम दिली जातेय. जवळपास ३२ महिने पैसे शेतकऱ्यांना दिले जात नाहीत, त्याच्या व्याजाचे काय? असा प्रश्न देखील मांडल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

हे देखील पहा :

राज्यातील साखर कारखाने हे राजकारणाचे अड्डे बनले आहेत. राज्यात ९ लाख ऊसतोडणी कामगार आहेत. गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला केंद्र सरकारने मदत तातडीने मदत करावी, ऊसतोडणी मजूर नावनोंदणी करावी अशी मागणी देखील यावेळी शेट्टी यांनी केली आहे. जे कारखाने एक रक्कमी एफआरपी देणार नाहीत ते कारखाने चालू देणार नाही. असा इशारा देखील त्यांनी सरकारला दिला आहे.

किरीट सोमय्यांवर निशाणा :

जरंडेश्वर सोबतच राज्यातील एकूण ४३ कारखान्यात घोळ आहे. मग फक्त जरंडेश्वरच का? गैरसोयीच्या माणसाचा घोटाळा बाहेर काढायचा अन सोयीच्या माणसाचा झाकून ठेवायचा, अशी टीका शेट्टी यांनी सोमय्यांवर केली आहे. मी सहा वर्षांपूर्वी हेच सांगत होतो. लिस्ट फार मोठी आहे, सगळे चोर आहेत, चोरांना सरकार पाठीशी घालत आहेत,असेही शेट्टी म्हणाले.

राजू शेट्टी यांचा सदाभाऊ खोत यांना टोला :

हर्बल तंबाखू पिकवण्यास परवानगी द्यावी असे पत्र भाजपचे आमदार व माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांना पाठवले होते. यावर प्रतिक्रिया देताना राजू शेट्टी म्हणाले, हर्बल तंबाखूचा पहिला प्रयोग सदाभाऊ खोत यांनी आपल्या शेतात करावा.

यावेळी शेट्टी यांनी खोतांबाबत अधिक भाष्य करायचे टाळत, मी त्या माणसावर जास्त बोलणार नाही, अशी टिपण्णी केली.

तसेच, मी महाविकास आघाडीवर नाराज अन भाजप सरकारवर खुश अस काही नसून, माझी वाटचाल अशीच असणार आहे, जो आडवा येईल त्याला तुडवायचा हे धोरण कायम असणार असल्याचे शेट्टी म्हणाले.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palak Paratha Recipe : पालकांनो सकाळी मुलांना घाईगडबडीत द्या पौष्टिक नाश्ता, झटपट बनवा 'पालक पराठा'

Maharashtra Live News Update: गणेशोत्सवासाठी रत्नागिरी जिल्ह्यातून २,५०० जादा एसटी बस , ४०० गाड्या फुल

Phone Repair Tips: फोन दुरुस्तीसाठी देण्याआधी ‘ही’ कामं नक्की करा! अन्यथा होईल मोठा धोका

Sitaare Zameen Par : तारीख ठरली! आमिर खानचा 'सितारे जमीन पर' युट्यूबवर, किती रुपयांत पाहता येणार?

Russia Earthquake : रशियात ८.७ रेश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप, त्सुनामीचा इशारा, हादरवणारा व्हिडिओ समोर

SCROLL FOR NEXT