Raju Patil Vs Shrikant Shinde Saam TV
महाराष्ट्र

Raju Patil Vs Shrikant Shinde: शीळफाट्याच्या ट्रॅफिकने स्वतःचेच विक्रम मोडले; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत मनसे आमदार राजू पाटलांची श्रीकांत शिंदेंवर टीका

Raju Patil Vs Shrikant Shinde: कल्याण लोकसभा मतदारसंघातील कल्याण, कल्याण पूर्व, डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर शहरांसह शिळफाटा रोडवरील वाहतुकीच्या नियोजनाबाबतचा हा व्हिडीओ आहे.

Ruchika Jadhav

कल्याण अभिजित देशमुख

Kalyan Traffic:

शीळफाटा रोडवर वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. वाहतूक कोंडीपासून नागरिकांची सुटका व्हावी यासाठी खासदा श्रीकांत शिंदे यांनी काही प्रकल्प समोर आणले आहेत. याबाबत आपल्या ट्वीटर अकाउंटवर व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी सविस्तर माहिती दिलीये. त्यांच्या या व्हिडीओवरून मनसे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी मुख्यमंत्र्यांचं नाव घेत श्रीकांत शिंदेंवर टीकास्त्र सोडलंय.

कल्याण शहर वाहतूक कोंडी (Traffic Jam) मुक्त करणारा गेम चेंजर प्रकल्प अशा आशयाचा व्हिडीयो खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सोशल मीडियावर अपलोड केला आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघातील कल्याण, कल्याण पूर्व, डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर शहरांसह शिळफाटा रोडवरील वाहतुकीच्या नियोजनाबाबतचा हा व्हिडीओ आहे.

ट्वीटमध्ये आमदार पाटील यांनी म्हटलं की, मुख्यमंत्री साहेब आपले पुत्र पण येथील लोकप्रतिनिधी आहेत. वाहतुककोंडी सुटावी यासाठी रोज नव्यानव्या ‘स्किम’ घेऊन येतात, त्या स्किम नसतातच. तो पॉकेटमनीसाठी केलेला 'स्कॅम' असतो, अश्या चर्चा ठेकेदार वर्गात सुरू असल्याचं राजू पाटील यांनी म्हटलं आहे.

गरोदर बायका, वृध्द, रुग्ण सगळे तासनतास ट्रॅफिकला सामोरे जातायत. तेही आपल्या सुपुत्राच्या मतदारसंघात? महाराष्ट्राने काय अपेक्षा ठेवायच्या? कधीतरी आमच्या सूचनांचा विचार करा. कदाचीत वाहतूक कोंडी कमी होईल! पाहिजे तर श्रेय तुमच्याच पुत्राला घेऊ द्या पण एकदा आमच्या सूचना ऐकण्यासाठी वेळ द्या व शिळफाट्याच्या ट्रॅफिक जामचा शिक्का तेवढा पुसा, असा उपहासात्मक सल्ला राजू पाटील यांनी दिलाय .

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! छुप्या प्रचारावर करडी नजर

Viral Video: रुग्णवाहिकेला रस्ता न देणे महागात पडले, पोलिसांनी शिकवल धडा, लाखोंचा दंड, लायसन्सही रद्द, Video बघाच

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! दर महिन्याला मिळणार ९००० रुपये; कसं? जाणून घ्या

Success Story: IIT मुंबईमधून शिक्षण, लाखोंची नोकरी नाकारली, अवघ्या २२ व्या वर्षी UPSC क्रॅक ;IAS सिमी करण यांची सक्सेस स्टोरी

Shukra Gochar 2024: नोव्हेंबर अखेरीस शुक्राचं नक्षत्र गोचर वाढवणार डोकेदुखी; आर्थिक हानी होण्याचा धोका

SCROLL FOR NEXT