rajkot to mahbubnagar train saam tv
महाराष्ट्र

Rajkot To Mahbubnagar Train : राजकोट-मेहबूब नगर- राजकोट विशेष गाडी धावणार; अकोला, वाशीम, हिंगोली, पूर्णा, नांदेडकरांत चैतन्य

प्रवाशांची मागणी पुर्ण झाली.

Siddharth Latkar

- संजय सूर्यवंशी

Nanded News : गेल्या अनेक दिवसांपासून रेल्वे प्रवासी मागणी करीत असलेल्या राजकोट ते मेहबूब नगर (rajkot to mahbubnagar train) या रेल्वे गाडीस पश्चिम रेल्वे विभागाने हिरवा झेंडा दाखविला आहे. यामुळे प्रवाशांमध्ये चैतन्याचे वातावरण पसरले आहे. (Breaking Marathi News)

पश्चिम रेल्वे विभागाने नुकताच राजकोट ते मेहबूब नगर ही विशेष गाडी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनूसार या गाडीच्या 24 फेऱ्या हाेतील. ही गाडी सोमवारी दुपारी एक वाजून 45 मिनिटांनी राजकोट इथून सुटेल.

अहमदाबाद, वडोदरा, भुसावळ, अकोला, वाशीम, हिंगोली, वसमत, पूर्णा, नांदेड मार्गे निझामाबाद, महेबुब नगर येथे मंगळवारी सकाळी सात वाजून 35 मिनिटाला पोहचेल. दरम्यान याच मार्गाने मंगळवारी महेबुब नगर इथून सकाळी नऊ वाजून 35 मिनिटांनी गाडी सुटेल. राजकोट येथे गुरुवारी पहाटे पाच वाजता पोहचेल अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वे विभागाने दिली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss Bhakri Recipe : ज्वारी, बाजरी, नाचणी, तांदूळ; वजन कमी करण्यासाठी कोणती भाकरी फायदेशीर?

CM सुवेंदु अधिकारींचे पहिल्याच कॅबिनेटमध्ये 5 धडाकेबाज निर्णय; पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार सुसाट!

Prediabetes Symptoms: प्री- डायबिटीजची ही ३ सुरुवातीची लक्षणं अजिबात करू नका दुर्लक्षित, तज्ज्ञांनी दिली महत्वाची माहिती

Maharashtra News Live Update: सोनं खरेदीबाबत पंतप्रधानांच्या आवाहनाला मंत्री भरत गोगावले यांची अनोखी प्रतिक्रिया

तमिळनाडूत राजकीय घडामोडींना वेग; CM विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट, दोघांमध्ये काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT