#परीक्षांचाधंदाथांबवा; देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांना राजेश टोपे यांचे उत्तर Saam Tv
महाराष्ट्र

#परीक्षांचाधंदाथांबवा; देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांना राजेश टोपे यांचे उत्तर

परीक्षा पारदर्शकपणे होण्यासाठी मी किती मेहनत घेतली हे फडणवीस यांना माहीत आहे

लक्ष्मण सोळुंके

जालना : राज्यातील आरोग्य विभागाच्या परीक्षा ऐनवेळी रद्द करण्याची घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. त्यामुळे आज दिवसभर परिक्षार्थींमध्ये गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले आहे. दरम्यान विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या परीक्षेमध्ये दलाल शिरले, असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

हे देखील पहा-

तर या परीक्षा पारदर्शकपणे होण्यासाठी मी किती प्रयत्न केलेत आणि किती मेहनत घेतली हे फडणवीस यांना माहीत आहे. मात्र, प्रत्येक परीक्षेत काही प्रवृत्त्या असे वाईट काम करत असतात, असेही टोपे यांनी म्हटले आहे. मात्र, येणाऱ्या ८- १० दिवसांत पारदर्शक परीक्षा घेतल्या जाणार असून, परीक्षा रद्द करण्याचा निर्णय हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विश्वासात घेऊन एकत्रितपणे घेण्यात आल्याचे राजेश टोपेंनी सांगितले आहे.

आरोग्य विभागाची भरती परीक्षा रद्द झाल्याने परीक्षेसाठी जाणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागला आहे. काहींना रेल्वे स्टेशनवर तर आजूबाजूच्या अनेक जिल्ह्यातील विद्यार्थी परीक्षेसाठी मोठ्या आशेने आले होते. मात्र, ऐनवेळी परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांना रेल्वे स्टेशनवर आणि बस स्थानकवरती रात्र काढावी लागली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पंढरपुरात कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासाठी राष्ट्रवादीचा तहसील कार्यालयावर मोर्चा

Asian Games 2026 : भारतीय महिला कबड्डी संघानं इतिहास रचला; एशियन गेम्समध्ये गोल्ड मेडलवर कोरलं नाव, ईराणला नमवलं

Gyanesh kumar : ज्ञानेश कुमारांविरोधात मुंबईत ठाकरेंचं वादळ; ४ ऑक्टोबरला शिवसेना-मनसेचा महामोर्चा

Hair Care: हेअर फॉल होईल कमी, फक्त ३ आठवडे कांद्याचा रस लावून पाहा, केस होतील मजबूत आणि घनदाट

२६५ तालुक्यात दुष्काळ, पंचनाम्याला सुरूवात; देवेंद्र फडणवीसांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना महत्त्वाचे आदेश

SCROLL FOR NEXT