rajendra dhabhade 
महाराष्ट्र

परब हल्ला प्रकरणी ६ अटकेत; नितेश राणेंचा अटकपुर्वसाठी अर्ज

हे प्रकरण तापले असतानाच आज (साेमवार) आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली कणकवली पाेलिस ठाण्यावर माेर्चा काढण्यात आला.

अनंत पाताडे

सिंधूदूर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीचे वातावरण तापू लागलेले आहे. संतोष परब यांच्या हल्ल्यासंदर्भात सहा संशयित आरोपी पकडल्याची माहिती पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी माध्यमांना दिला. आमदार नितेश राणे यांच्याबाबत काही न बाेलता या प्रकरणाचा सध्या तपास सुरु आहे इतकेच दाभाडे यांनी म्हटलं. दरम्यान सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात आमदार नितेश राणे यांच्या वकीलांनी राणेंच्या अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

दाभाडे म्हणाले एक आरोपी दिल्लीवरून (delhi) कणकवलीत आणण्यात आला आहे. त्यास न्यायालयामध्ये हजर केले. चार जानेवारीपर्यंत संबंधितास पोलिस कोठडी मिळाली आहे. सध्या घटना क्रमाचा तपास सुरू असल्याचं दाभाडे यांनी सांगितले मात्र आमदार नितेश राणे (nitesh rane) यांच्या संदर्भात कोणतेही माहिती दिली नाही.

हे प्रकरण तापले असतानाच आज (साेमवार) आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली कणकवली पाेलिस ठाण्यावर माेर्चा काढण्यात आला. यावेळी शिवसैनिकांनी संताेष परब यांच्यावरील हल्ल्यासंदर्भात तातडीने मुख्य सूत्रधार आमदार नितेश राणे यांना अटक करावी अशी मागणी केली. दरम्यान सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात आमदार नितेश राणे यांच्या वकीलांनी राणेंच्या अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weekly Horoscope: काहींना कामात यश मिळेल तर काहींना प्रवास जपून करावा लागेल, पाहा साप्ताहिक राशीभविष्य

Nishikant Dubey Anti-Marathi : मराठी माणसाला डिवचा, प्रसिद्धी मिळवा; लालू, अमरसिंहनंतर आला निशिकांत दुबे

Pakistan : पाकिस्तानात होणार सत्तापालट? असीम मुनीर होणार राष्ट्रपती? बिलावल भुट्टोच्या विधानामुळे खळबळ

Russia News : पुतिन यांनी मंत्रिमडळातून काढलं; काही तासांतच मंत्र्याने आयुष्य संपवलं, जगात खळबळ

Shravan Somvar: पहिल्या श्रावण सोमवारी करा 'असे' उपाय, महादेव होतील प्रसन्न

SCROLL FOR NEXT