sambhaji bhide , Sambhaji Bhide Controversial Statement saam tv
महाराष्ट्र

Sambhaji Bhide आज पाेलिस ठाण्यात हजर राहणार ?

Sambhaji Bhide Marathi News : संभाजी भिडे यांच्यावर विविध जिल्ह्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Siddharth Latkar

- अमर घटारे

Amravati News : महात्मा गांधी (mahatma gandhi) यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याची चाैकशी करण्यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे (shiv pratishthan hindustan chief sambhaji bhide) यांना अमरावती पाेलिस दलाने नाेटीस बजावली आहे. पोलिसांनी कलम 41 (1) (अ) नुसार संभाजी भिडेंना नोटीस बजावल्याची माहिती साम टीव्हीला दिली आहे. (Maharashtra News)

अमरावती येथील राजापेठ पोलिसांनी संभाजी भिडेंनी त्यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्याच्या संदर्भाने भिडे आणि त्यांच्या सहकार्यांना नोटीस पाठवली आहे. पोलीसांनी चौकशीला बोलावल्यास संभाजी भिडेंना पोलिसात किंवा न्यायालयात हजर राहावे लागणार आहे. संशयित आरोपीला अटक करण्यापूर्वी पोलिसांच्या वतीने नोटीस दिली जाते.

त्यानूसार पोलिसांनी कायद्याच्या कलम 41 (1) (अ) नुसार संभाजी भिडेंना नोटीस देण्यात आली आहे. त्यामुळे भिडे यांना पोलिसांना चौकशीसाठी सहकार्य करावे लागेल असे सूत्रांनी स्पष्ट केले.

संभाजीनगरच्या कार्यक्रमास पाेलिसांनी नाकारली भिडेंना परवानगी

छत्रपती संभाजीनगर शहरात आज (मंगळवार) संभाजी भिडे यांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, त्या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. काँग्रेससह महाविकास आघाडीने हा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Airstrike : पाकिस्तानचा अफगाणिस्तान एअरस्ट्राइक; मध्यरात्रीच्या हवाई हल्ल्यात ५ मुलांसह ९ जणांचा दुर्दैवी अंत

Maharashtra News Live Update: अमरावती शिक्षक मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार निश्चित

Dahi Kadhi Recipe : ना फुटेल, ना चव बिघडेल! एकदा 'अशी' बनवून पाहा दही-कढी

IND vs SL : भारताचा श्रीलंकेवर १२४ धावांनी दणदणीत विजय; अंतिम सामन्यात पाकिस्तानशी महामुकाबला

Benefits of Squats: वजन कमी करायचं आहे? मग रोज सकाळी १० मिनिटं स्क्वाट्स एक्सरसाइज नक्की करा

SCROLL FOR NEXT