Sanjay Raut  Saam Tv News
महाराष्ट्र

Sanjay Raut: 'सत्ता गेल्यावर तडफडतो तो शिवसैनिक नाही', संजय राऊतांचा साळवींवर हल्लाबोल

Sanjay Raut attacks Rajan Salvi: राजन साळवी यांनी शिंदे गटात केलेल्या पक्षप्रवेशानंतर ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.

Bhagyashree Kamble

माजी आमदार राजन साळवी यांनी ठाकरे गटाची साथ सोडत धनुष्यबाण हाती घेतलं आहे. माजी खासदार विनायक राऊत हे विधानसभेतील निवडणुकीला कारणीभूत असल्याचं सांगत साळवी यांनी शिंदेंची वाट धरली.

राजन साळवी यांनी शिंदे गटात केलेल्या पक्षप्रवेशानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे. सत्ता गेल्यावर जो तडफडत राहतो त्याला शिवसैनिक म्हणत नाही, अशा शब्दात त्यांनी साळवींवर टीका केली आहे.

'हे स्वत:ला बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणतात. सत्ता गेल्यावर तडफड राहतो, त्याला शिवसैनिक म्हणत नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अनेक काळ सत्तेशिवाय राहिले, त्यांच्याबरोबर आम्हीही सत्तेशिवाय राहिलो', असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राजन साळवींना टार्गेट करत टीका केली आहे.

'बाळासाहेबांनी त्यांच्या आयुष्यातील सगळा काळ सत्तेशिवाय काढला. आम्हाला सत्ता फार उशिरा मिळाली. आमच्या स्वप्नातही नव्हतं, आम्ही कधी आमदार, किंवा खासदार होऊ. आम्ही सत्तेत नसतानाही बाळासाहेबांबरोबर राहिलो आणि यापुढेही राहू. आमच्यासाठी सत्ता हेच सर्वस्व नाही. संकटकाळात नेते पक्षाबरोबर राहिले पाहिजे. पक्षांतर्गत मतभेद नंतरही दूर करता येतात', असंही संजय राऊत म्हणाले.

एकनाथ शिंदे खोटारडा माणूस

'ईडी, सीबीआयला घाबरून पळणारी हे लोक आहेत. घरगडी असते तर त्यांना इतके वर्ष महत्त्वाची खाती दिली असती का? मंत्रिमंडळात महत्त्वाची खाती दिली असती का? नगरविकास खाते मुख्यमंत्री कधी सोडत नाही. पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ते खाते आपल्या जवळच्या सहकाऱ्याला म्हणजेच एकनाथ शिंदे यांना दिले होते. शिंदे हा खोटारडा माणूस आहे', असा घणाघात राऊत यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: तुळजापुरात शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

Olya Khobryachi Karanji Recipe : ओल्या खोबऱ्याची करंजी बनेल एकदम खुसखुशीत, पीठ मळताना फॉलो करा 'या' ३ टिप्स

Maharashtra Drought: मोठी बातमी! राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

SCROLL FOR NEXT