Sanjay Raut Talk On Raj-Uddhav Thackeray Yuti saam Tv
महाराष्ट्र

Raj-Uddhav Thackeray Yuti: दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार; तारीख अन् ठिकाणही ठरलं

Sanjay Raut Talk On Raj-Uddhav Thackeray Yuti: राज-उद्धव ठाकरे हे एकत्र येणारच. दोन्ही बंधू ५ जुलैला एकत्र येणार असल्याचं विधान संजय राऊत यांनी केलंय.

Bharat Jadhav

महायुती सरकारनं हिंदी भाषा सक्तीचा निर्णय घेतला होता, त्या निर्णयाविरोधात राज-उद्धव ठाकरेंनी दंड थोपटले होते. दोन्ही ठाकरे बंधू ५ जुलैला सरकारच्या निर्णयाविरोधात भव्य मोर्चा काढणार होते. परंतु त्याआधीच सरकारनं हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतला. त्यामुळे ५ जुलैला होणाऱ्या मोर्चाविषयी प्रश्न केले जात आहेत. ठाकरे बंधू एकत्र येणार की नाही, हे प्रश्न विचारलं जात आहेत. या प्रश्नाचे उत्तर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी दिले आहे.

साम टीव्हीच्या 'ब्लॅक अॅण्ड व्हाईट' कार्यक्रमात त्यांनी दिलेल्या मुलाखतीत ठाकरे बंधू एकत्र येणारचं, असं विधान केलंय. महाराष्ट्रात सरकारकडून हिंदी भाषा थोपवली जात होती. त्याला ठाकरे बंधूंनी विरोध केला. दोन्ही बंधूंची विचारधारा एक होती. दोघांनी महाराष्ट्राच्या हितासाठी दंड थोपटले होते. आता दोन्ही बंधू एकत्र येणार असल्याचा दावा संजय राऊत यांनी केलाय. महायुती सरकारच्या निर्णय महाराष्ट्राच्या हिताचा नव्हता. त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या निर्णयविरोधात मैदानात उतरले. हिंदी सक्तीविरोधात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघांनी मोर्चा काढण्याचं ठरवलं होतं. एकाच मुद्द्यासाठी दोन मोर्चा आणि दोन वेगळ्या तारखा होणार होत्या.

उद्धव ठाकर हे ७ तारखेला मोर्चा काढणार होते. तर राज ठाकरे ६ जुलैला हिंदी सक्तीविरोधात मोर्चा काढणार होते. दोघांची एकच विचारधारा होती. पण दोन मोर्चा निघणार होते, पण हे चित्र महाराष्ट्रासाठी चांगलं दिसणार नव्हतं. त्यामुळे राज ठाकरेंनी एकच मोर्चा काढण्याचा प्रस्ताव उद्धव ठाकरेंसमोर ठेवला होता. त्यांची माझ्यासोबतही चर्चा झाली. दोघांच्या चर्चेनंतर ५ जुलैला सरकारच्या निर्णयाविरोधात मोर्चा काढण्याचं ठरवलं गेलं. पण त्याआधीच मुख्यमंत्र्यांनी निर्णय मागे घेतला. त्यामुळे दोन्ही बंधू एकत्र येण्याचं कारण होतं तेच आता राहिले नाही. मग ठाकरे बंधू एकत्र येणार का? असा सवाल केला जातोय.

ठिकाण आणि तारीख ठरली?

दोन्ही बंधू मराठीच्या मुद्द्यावरून एकत्र येणार होते. पण सरकारने जीआर मागे घेतलाय. त्यामुळे मोर्चा आणि दोन्ही बंधूंबाबत प्रश्न केले जात आहेत. लोकांना उत्कांटा होती, अख्खा महाराष्ट्राला दोन्ही बंधू एकत्र यावेत, अशी आशा आहे. यामुळे ५ जुलैला दोन्ही बंधू येणार ही लोकांची इच्छा होती. आता त्याबाबत विचार केला जात आहे. ठरलेल्या दिवशीच एक विजयी मोर्चा काढला जाणार आहे. यात दोन्ही बंधू असतील. शिवतीर्थ किंवा वरळीत हा मोर्चा काढला जाणार असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ZP Election Date : ४६ दिवस शिल्लक, जिल्हा परिषद निवडणुकीच्या घोषणा कधी?

Plane Crash: लँडिंगदरम्यान विमान कोसळलं, ७ जणांचा मृत्यू; पाहा थरकाप उडवणारा VIDEO

Nashik Travel : किल्ल्यांचे विहंगम दृश्य अन् आव्हानात्मक ट्रेक, नाशिकमध्ये लपलंय 'हे' सुंदर ऐतिहासिक ठिकाण

Maharashtra Live News Update: अशोक चव्हाण यांच्या समर्थकांकडून आचारसंहितेचा भंग

Municipal Elections : निवडणुका लागताच महायुतीत मिठाचा खडा, अजित पवार स्वबळावर लढणार, ठाण्यात रंगत वाढली

SCROLL FOR NEXT