Shivtirth meeting: Raj and Uddhav Thackeray discuss seat-sharing formula as alliance faces trouble. saam tv
महाराष्ट्र

Raj-Uddhav Thackeray Yuti: युतीचं घोडं जागावाटपावरून अडलं? ठाकरे बंधूंच्या भेटीची इनसाईड स्टोरी

Raj Uddhav Thackeray Alliance: ठाकरे बंधूंमध्ये जागावाटपावरून शिवतीर्थावर झालेल्या चर्चेची इनसाईड स्टोरी आता समोर आलीय. मात्र राज ठाकरेंच्या मागणीमुळे जागवाटपात उद्धव ठाकरेंपुढे पेच निर्माण झालाय? त्यामुळे ठाकरेसेनेनं मनसेसोबतच्या जागावाटपावर काय भूमिका घेतलीय? कोण किती जागा लढवणार? महायुतीला टक्कर देण्यासाठी काय रणनीती असणार? पाहूयात यावरचा हा विशेष रिपोर्ट.

Suprim Maskar

  • ठाकरे बंधूंमध्ये जागावाटपावरूनच रस्सीखेच सुरू

  • मराठीबहुल भागांतील अधिकाधिक जागांसाठी मनसे आग्रही

  • ठाकरे बंधूंच्या भेटीची इनसाईड स्टोरी

शिवतीर्थावर तब्बल 2 तास झालेल्या ठाकरे बंधूंमधील चर्चेनंतर आता या भेटीमागची इनसाईट स्टोरी समोर आलीय. मुंबई महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी ठाकरे बंधूंनी एकीकडे मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. तर दुसरीकडे जागावाटपाचा फायनल ड्राफ्ट ठरवण्यासाठी एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंमध्ये जागावाटपावरूनच रस्सीखेच सुरू झाल्याची चर्चा आहे. ठाकरे बंधूंच्या भेटीची इनसाईड स्टोरी नेमकी काय आहे? राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंकडे केलेल्या मागणीमुळे नेमकी कुणाची कोंडी झाली आहे? पाहूयात.

ठाकरे बंधूंच्या भेटीची इनसाईड स्टोरी

मराठीबहुल भागांतील अधिकाधिक जागांसाठी मनसे आग्रही

विद्यमान ठाकरेसेनेचे नगरसेवक असलेल्या 20-25 जागांची मनसेकडून मागणी

ठाकरेंकडून शिंदे गटात गेलेल्या काही नगरसेवकांच्या जागांसाठीही मनसे आग्रही

ठाकरेसेना मनसेची संघटनात्मक ताकद पाहूनच जागा सोडण्यावर ठाम

दादर, वरळी, माहिम, शिवडी, भायखळा, भांडुप, जोगेश्वरी अशा मराठी बहुल भागातील प्रभागांसाठी दोन्ही पक्षात रस्सीखेच

दुसरीकडे मुंबईसह राज्यातील 7 महापालिकांमध्ये ठाकरे बंधूंची युती होणार असल्याची शक्यता आहे.

मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे, पिंपरी चिंचवड, संभाजीनगर, वसई- विरार या महापालिकेत ठाकरे बंधूंची युती होणार आहे. दरम्यान मनसे नेत्यांनी जागावाटपाच्या चर्चेची योग्य वेळी माहिती देऊ असं विधान केलयं.

एकीकडे काँग्रेसने स्वबळाचा नारा दिल्यानंतरही ठाकरेसेना काँग्रेसला सोबत घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. अशातच मनसे आणि ठाकरेसेनेत 25 जागांवरून रस्सीखेच पाहायला मिळतेय. तर दुसरीकडे 2017 च्या आकडेवारीनुसार जागावाटप करा, अशी भूमिका ठाकरेसेनेने घेतलीय.

त्यामुळे जागावाटपाचा फायनल ड्राफ्ट तयार होण्यासाठी ठाकरे बंधूंमध्ये आणखी चर्चेच्या फेऱ्या होणार हे निश्चित. मात्र मविआतील मित्रपक्षानं दिलेला स्वबळाचा नारा आणि मनसेची मराठीबहुल 25 जागांवरची आग्रही मागणी यामुळे ठाकरेसेना काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नंदुरबारमध्ये निकालाचा एक दिवस अगोदर तळोदा शहरात जादूटोणा

महिलेला बोगस मतदान करताना पकडलं अन्...; नांदेडमध्ये नेमकं काय घडलं? VIDEO

BMC Election : महाविकास आघाडी फुटली; मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार

Kopargaon Nagarparishad: भाजप आणि अजित पवार गटाचे कार्यकर्ते भिडले, मतदान प्रक्रियेदरम्यान राडा | Video Viral

Bread Pakoda: तेलाचा एकही थेंब न वापरता बनवा हॉटेलच्या चवीसारखे ब्रेड पकोडे, वाचा झटपट रेसिपी

SCROLL FOR NEXT