Raj Thackeray warns Chief Minister Eknath Shinde over Namo Tourism Centres — sparks new political showdown in Maharashtra Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: आता राजसेना विरूद्ध शिंदेसेना, 'गडकिल्ल्यांवरील नमो सेंटर फोडणार'

Raj Thackeray Warns Eknath Shinde: नमो टुरिझम सेंटर्सवरुन राज ठाकरे विरुद्ध शिंदेसेना यांच्यात नव्या संघर्षाची ठिणगी पडलीय.. राज ठाकरेंनी थेट एकनाथ शिंदेंनाच इशारा दिलाय.. मात्र दोन्ही पक्षातील संघर्षामागची नेमकी कारणं काय आहेत?

Bharat Mohalkar

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर शिंदेसेना विरुद्ध राज सेना आमने-सामने आले आहेत.. आणि त्याला कारण ठरलंय पंतप्रधान मोदींच्या पंचाहत्तरीच्या निमित्ताने छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यावर सुरु करण्यात येणारे नमो टुरिझम सेंटर्स... उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नमो टुरिझम सेंटर्सची घोषणा केली आणि त्यावरुन राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर चांगलंच तोंडसुख घेतलं... नमो टुरिझम सेंटर्स उभे केले की फोडून टाकणार, असा थेट इशाराच राज ठाकरेंनी दिलाय..

राज ठाकरेंच्या टीकेनंतर आता शिंदेसेनेनेही राज ठाकरेंविरोधात मोर्चा उघडलाय.. तुम्ही नमो टुरिझम सेंटर्स फोडले तर आमचे हात बांधले आहेत का? असं म्हणत शिंदेसेना विरुद्ध राजसेना संघर्ष अटळ असल्याचे संकेत शिंदेसेनेनं दिलेत.. दुसरीकडे भाजपने तर थेट राज ठाकरेंचं कर्तृत्व काय? असा सवाल केलाय..

खरंतर शिवसेनेच्या फुटीनंतर राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंमध्ये भेटीगाठींचा सिलसिला सुरु होता.. त्यामुळे शत्रूचा शत्रू मित्र या सूत्रानुसार राजकीय समीकरणाचे आडाखे बांधले जात होते.. त्यातच राज ठाकरेंनी तर श्रीकांत शिंदेंसाठी प्रचार सभाही घेतली होती.. मात्र त्यानंतर विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरेंविरोधात शिंदेंनी उमेदवार दिल्यानं राज ठाकरे नाराज झाले..

. आता ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे बंधू एकत्र आल्यास त्याचा फटका शिंदेसेनेला बसू शकतो.. त्यामुळे आतापर्यंत उद्धव ठाकरेंची कोंडी करण्यासाठी सरसावलेली शिंदेसेना यापुढं राजसेनेलाही शिंगावर घेण्याची शक्यता आहे.. त्यामुळे आगामी काळात शिंदेसेना विरुद्ध राजसेना संघर्ष तीव्र होणार हे मात्र निश्चित..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : काँग्रेस नेत्याचा रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह; कुटुंबीयांना हत्येचा संशय

ऑफिस आम्हाला परत द्या! काँग्रेस कार्यकर्त्यांचा BRSच्या कार्यालयावर हल्ला; खुर्च्या, फर्नीचरला लावली आग

Maharashtra Politics: पोटात अन्न नाही, डोक्यात हॉटेलवरून उडी मारण्याचा विचार, बंड करणाऱ्या आमदारानं सांगितला गुवाहाटीचा भयानक किस्सा|VIDEO

Maharashtra Live News Update: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण झाल्याने ऊर भरून आलंय : विखे-पाटील

Mumbai :...तर आम्हीही रस्त्यावर उतरू; मुंबईतील कबूतरखान्यांचा वाद पुन्हा तापणार; मराठी एकीकरण समिती आक्रमक

SCROLL FOR NEXT