केंद्र सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या त्रिभाषेचं सूत्राला मनसेकडून विरोध करण्यात येत आहे. महाराष्ट्रात पहिलीपासूनच हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात आलीय, या निर्णयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरेंनी विरोध दर्शवलाय. हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही. ती देशातील इतर भाषांसारखी एक राज्यभाषा आहे. ती महाराष्ट्रात का म्हणून पहिलीपासून शिकायची? असा सवाल करत राज ठाकरेंनी केंद्राला थेट इशारा दिलाय.
राज ठाकरेंनी सोशल मीडियावर पोस्ट करत राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा २०२४ ला विरोध केलाय. तसेच शालेय अभ्यासक्रमातील हिंदीची पुस्तकं दुकानांमध्ये विकू दिली जाणार नाहीत. शाळांना देखील ती पुस्तकं विद्यार्थ्यांना वाटू दिली जाणार नाहीत, याची नोंद शाळा प्रशासनाने घ्यावी, असा इशारा राज ठाकरेंनी दिलाय. सोशल मीडियाच्या एक्स या साईटवर त्यांनी याबाबत पोस्ट केलीय.
यात पहिलीपासून हिंदी शिकवण्यात यावी, असं अनिवार्य करण्यात आलंय. त्याविरोधात पोस्ट करताना महाराष्ट्रात हिंदीची सक्ती खपवून घेतली जाणार नाही असा इशारा राज ठाकरेंनी दिलाय. केंद्र सरकार सध्या सर्वत्र 'हिंदीकरण' करण्याचे प्रयत्न करत आहे. हिंदीकरणाचे हे प्रयत्न राज्यात यशस्वी होऊ देणार नाहीत.
हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही. ही देशातील इतर भाषांसारखी एक राज्यभाषा असून ती महाराष्ट्रात पहिलीपासून का शिकवण्याची सक्ती का? असा सवाल राज ठाकरेंनी केलाय. केंद्राने त्यांचं त्रिभाषेचं सूत्र आहे ते सरकारी व्यवहारांपुरतेच मर्यादित ठेवावे, त्याला शिक्षणापर्यंत आणू नका, असा इशारा मनसेकडून देण्यात आलाय. या देशात भाषेनुसार प्रांतरचना झाली, आणि ती इतकी वर्ष टिकली. पण आत्ताच ही दुसऱ्या प्रांताची भाषा येथे महाराष्ट्रावर लादण्याचा प्रकार का सुरू झालेत? भाषावार प्रांतरचनेच्या तत्वालाच हरताळ फासला जात असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केलाय.
सोशल मीडिया पोस्टमधून केंद्राला इशारा देताना राज ठाकरे म्हणाले आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही आहोत ! महाराष्ट्रावर हिंदीकरणाचा मुलामा द्यायचा प्रयत्न कराल तर महाराष्ट्रात संघर्ष अटळ आहे. सरकार हा संघर्ष मुद्दामून घडवत आहे. तर येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये मराठीविरुद्ध मराठीत्तर असा संघर्ष घडवून सरकर स्वतःचा फायदा करून घेण्याचा प्रयत्न करत आहे, त्यामुळेच हा सगळा अट्टाहास सुरु आहे का ? असा सवालही राज ठाकरेंनी उपस्थिती केला.
महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी भाषा शिकण्याची सक्ती खपवून घेतली जाणार नाही. शालेय अभ्यासक्रमातील हिंदीची पुस्तकं दुकानांमध्ये विकू दिली जाणार नाहीत. शाळांना देखील ती पुस्तकं विद्यार्थ्यांना वाटू दिली जाणार नाहीत, याची नोंद शाळा प्रशासनाने घ्यावी, असा थेट इशारा राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमधून केलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.