Raj Thackeray  Saam TV
महाराष्ट्र

राज ठाकरेंवर गुन्हा दाखल होणार?; औरंगाबादच्या सभेत अटी-शर्तींचा भंग केल्याचा निष्कर्ष

राज ठाकरे यांच्या सभेनंतर पोलिसांच्या दोन ब्रँचचे दोन अहवाल पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद: राज ठाकरे यांच्या सभेनंतर पोलिसांच्या दोन ब्रँचचे दोन अहवाल पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सोबत एका अहवालावर अभ्यास सुरू असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितले आहे. पोलीस आयुक्त कार्यालयातील एस बी शाखा दैनंदिन अहवाल एसआयडीला पाठवते. तो दैनंदिन अहवाल एसबीने डीजीला पाठवला आहे. औरंगाबादमध्ये एसआयडीची (SID) शाखा आहे. औरंगाबाद येथील सीआयडीच्या उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांचा सभेचा अहवाल वरिष्ठांना पाठवला आहे. (Raj Thackeray Aurangabad Speech)

राज ठाकरे यांनी अटी शर्तीचा भंग केल्याचं प्रथम दर्शनी पोलीस निष्कर्षावर पोहोचले आहेत. त्यांच्यावर काय कारवाई करावी याबाबत अभ्यास केला जात आहे. त्यानंतर तो अहवाल डीजींना पाठवण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे सभेचे आयोजनानंतर आयोजक अथवा राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल होणार का हे मात्र अहवालावर वरिष्ठांनी कळवल्यानंतरच कारवाई होण्याची शक्यता आहे.

दरम्यान राज ठाकरेंना औरंगाबादच्या सभेसाठी पोलिसांनी काही अटी शर्ती घालून दिल्या होत्या. त्या राज ठाकरेंनी पाळल्या नव्हत्या असे पोलिसांनी सांगितले आहे. त्याचबरोबर राज ठाकरेंनी आपल्या भाषणात काही चिथावणीखोर भाष्य केले आहे का याचाही तपास पोलीस अधिकारी करत आहेत. राज यांनी सरकारला ४ तारखेचा अल्टीमेटम दिला आहे. मशिदीवरील भोंगे उतरवा अन्यथा जिथे भोंगे वाजतील त्याच्या समोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावा असे आवाहन राज ठाकरे यांनी तमाम हिंदूंना केले आहे. सभेपुर्वी राज ठाकरेंनी कोणत्याही समुदयाची मने दुखावतील असे वक्तव्य करु नये अशी नोटीस पोलिसांनी दिली होती. आता त्याचे पालन राज ठाकरेंनी कितपत केले आहे हे पोलीस तपास उघड होईल.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: भाजप १०० जागा लढेल तर आम्ही ५० पण...; जागावाटपावर शिवसेना नेत्याचं मोठं वक्तव्य

Pandharpur Accident: भुजबळ वस्तीजवळ कार आणि दुचाकीचा भीषण अपघात; दोन्ही वाहनांचा चक्काचूर

Phone: चुकूनही फोन १०० टक्के चार्ज करु नका, अन्यथा...

Maharashtra Live News Update: हातात कोयता घेऊन तरुणाचा दहशत माजवण्याचा प्रयत्न; व्हिडिओ व्हायरल

DRI मुंबईची भव्य कारवाई; २३ कोटींचा ई-कचरा जप्त, मास्टरमाईंड अटक

SCROLL FOR NEXT