Raj Thackeray Kokan Sabha, Raj Thackeray Ratnagiri, Raj Thackeray  saam tv
महाराष्ट्र

Raj Thackeray Kokan Sabha : 'काेकणपट्यात माेठा उत्साह, साहेबांची सभा सर्व रेकाॅर्ड ब्रेक करेल'; राज ठाकरेंची उद्या रत्नागिरीत तोफ धडधडणार

या सभेसाठी लाेक उत्साही आहेत असे मनसे नेत्यांनी नमूद केले.

अमोल कलये

Raj Thackeray News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या रत्नागिरीतील उद्याच्या (शनिवार) सभेच्या तयारीची अंतिम टप्प्यात आली आहे. शहरात राज ठाकरेंची हाेणारी सभा पहिलीच सभा असल्याने संपुर्ण काेकणातील जनता या सभेस येईल असा अंदाज बांधला जात आहे. मनसे नेेते नितीन सरदेसाई यांनी यापुर्वीच्या सभांचे रेकाॅर्ड ब्रेक हाेईल असा दावा साम टीव्हीशी बाेलताना केला आहे. (Breaking Marathi News)

रत्नागिरी शहरातील प्रमोद महाजन क्रिडा संकुल मैदानावर राज ठाकरेंच्या सभेसाठीची मनसैनिक जय्यत तयारी करीत आहेत. रत्नागिरी शहरातील मनसैनिकांना या सभेला माेठी गर्दी हाेईल असा विश्वास आहे.

काेकणातील राजकारणाला येथील जनता कंटाळली आहे असे मनसैनिकांचे म्हणणे आहे. त्यामुळेच राज साहेबांच्या सभेला काेकणी जनता माेठ्या संख्येने उपस्थित राहील असे मनसैनिकांनी नमूद केले.

मनसेचे नेते नितीन सरदेसाई म्हणाले राज ठाकरे यांची काेकणातील रत्नागिरीतील पहिली सभा आहे. मी दाेन दिवासांपासून येथे आहे. अनेकांशी मी संवाद साधला. लाेक उत्साही आहेत. ही सभा रेकाॅर्ड ब्रेक सभा हाेईल असा विश्वा सरदेसाई यांनी व्यक्त केला. मनसेने सभेची सर्व तयारी पूर्ण केल्याचे सरदेसाईंनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Police Officers Promotion: राज्यातील १५० पेक्षा अधिक पोलीस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचे आदेश; वाचा संपूर्ण लिस्ट

Bogus Voter Scam: राहुल गांधींकडून पुराव्यांसह बोगस मतदारांचा भांडाफोड; सांगितली नोंदणीची मोडस ऑपरेंडी

Vantara:'माधुरी'नंतर वनताराचा 'गौरी'वर डोळा? गौरी हत्तीणीसाठी 3 कोटींची ऑफर?

Shocking : महाराष्ट्र हादरला! ७ वर्षीय विद्यार्थिनीवर शिक्षकाकडून अत्याचार, पालकांमध्ये संताप

Kharadi Rave Party: जावई खेवलकरांच्या मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ फोल्डर, चाकणकरांच्या आरोपांनंतर सासरे खडसेंचा पारा चढला

SCROLL FOR NEXT