Raj Thackeray SAAM TV
महाराष्ट्र

Raj Thackeray News : माहीमचं अनधिकृत बांधकाम हटलं, सांगलीत दाेन्ही गटाचा जागेवर दावा; मनसे नेते दाखल (पाहा व्हिडिओ)

MNS News: या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसवण्यात आलेले आहेत.

विजय पाटील

Sangli News: मनसे नेते राज ठाकरे (raj thackeray latest news) यांनी सांगलीच्या कुपवाड नजीक अनधिकृत मशीद बांधकाम प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला आहे. यामुळे त्या वादग्रस्त जागेचा मुद्दा पुन्हा समोर आला आहे. आज (गुरवार) सकाळपासून घटनास्थळी पाेलिसांचा बंदाेबस्त ठेवण्यात आला आहे. या जागेवर दावा करणारे दाेन्ही गट देखील कागदपत्रांसह उपस्थित राहिले आहेत. (Breaking Marathi News)

एक महिन्यापूर्वी या ठिकाणी मशीद बांधकामाच्या वादातून दोन गटात मारामारीचा प्रकार घडला होता. या प्रकरणी संजयनगर पोलीस ठाण्यात (sanjay nagar police station) दोन्ही गटाकडून परस्पर तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी 15 जणांच्या विरोधात गुन्हे दाखल केले होते.

सांगलीच्या कुपवाड रोडवरील सूतगिरणी नजीक मंगलमूर्ती कॉलनी या ठिकाणी एका मशिदीच्या बांधकामावरून 26 फेब्रुवारीलाी दोन गटांत मारामारीचा प्रकार घडला होता. या ठिकाणी महापालिकेचे शाळेचे आरक्षण असल्याचा दावा करत स्थानिक रहिवाशांनी या मशिदीला विरोध केला. त्याचबरोबर या ठिकाणी बहुसंख्य हिंदू समाज असल्याने मशिद नको अशी भूमिका स्थानिक नागरिकांची आहे.

सध्या या परिसरात असणाऱ्या वादग्रस्त मशीदच्या जागेत पत्र्याचे मोठे कंपाउंड मारण्यात आले आहे. त्याचबरोबर या ठिकाणी या जागेला कुलूप देखील लावण्यात आले आहे. तसेच आवारामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसवण्यात आलेले आहेत.

या ठिकाणी हिंदु आणि मुस्लिम समाजातील काही नागरिक त्यांच्याकडील कागदपत्रांसह आली आहेत. तसेच सांगली महापालिकेचे नगररचना विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. या ठिकाणी जागेचं मोजमाप नगर रचना विभागाकडून सुरू आहे. दरम्यान या ठिकाणी मनसे नेते तानाजी सावंत दाखल झाले आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: बारामतीमध्ये अजित पवारांच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष करायला सुरुवात

South Indian Star : दाक्षिणात्य कलाकारांना मुंबईची भुरळ, रश्मिका मंदानासह 'या' सेलिब्रिटींनी घेतले आलिशान फ्लॅट

Maharashtra Election Results : बाळासाहेब थोरात, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार पिछाडीवर, टॉप १० मतदारसंघातल्या लढतीत काय स्थिती

Healthy Breakfast: नाश्त्यासाठी बनवा कमी साहित्याचा 'हा' पौष्टीक पदार्थ

Chopda Vidhan Sabha : निवडणुकीचे काम टाळणाऱ्या २१ कर्मचाऱ्यांवर गुन्हा; विनापरवानगी राहिले गैरहजर

SCROLL FOR NEXT