Raj Thackeray , Sangli, MNS, Kupwad Saam tv
महाराष्ट्र

Sangli News: राज ठाकरेंचा अल्टीमेटम अन् सांगली महापालिका अधिका-यांची पळापळ, महापालिका आयुक्तांनी घेतला 'हा' निर्णय

Raj Thackeray News: राज ठाकरे यांच्या सभेनंतर सांगली महापालिकेचे कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले.

विजय पाटील

Sangli News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे (raj thackeray latest news) यांनी गुढी पाडव्याच्या सभेत सांगली (sangli) येथील कुपवाड नजीक झालेल्या अनधिकृत मशीद बांधकाम प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर आज सकाळी महापालिकेच्या अधिका-यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर दुपारी महापालिका आयुक्तांनी संबंधित ठिकाणी झालेले अनधिकृत असल्याचे नमूद केले. अनिधकृत बांधकाम तात्काळ काढले जाईल असेही आयुक्तांंनी स्पष्ट केले. (Breaking News)

सांगलीच्या कुपवाड रोडवरील सूतगिरणी नजीक मंगलमूर्ती कॉलनी आहे. या ठिकाणी एका मशिदीच्या बांधकामाचा विषय राज ठाकरे यांनी बुधवारी झालेल्या सभेत छेडला. यावर कारवाई न झाल्यास मनसे पुढचं पाऊल उचलले असा इशारा देखील ठाकरेंनी भर सभेत दिला.

आज घटनास्थळाची महापालिकेच्या नगर रचना विभागाने पाहणी केली. या विभागाच्या अधिकारी यांनी महापालिका आयुक्त सुनील पवार यांच्याकडे अहवाल सुपुर्द केला. दुपारी आयुक्त सुनील पवार यांनी माध्यमांशी बाेलताना संबंधित ठिकाणी प्राथमिक शाळेचे आरक्षण असल्याचे स्पष्ट केले.

तात्काळ अनधिकृत बांधकाम काढणार

ते म्हणाले बुधवारी माध्यमातून आम्हांला मंगलमुर्ती काॅलनीत प्रार्थनास्थळाचे अनधिकृत बांधकाम सुरु असल्याची माहिती समजली. त्यानंतर तात्काळ तेथे अधिकारी, कर्मचारी पाठविण्यात आले. या ठिकाणी प्राथमिक शाळेचे आरक्षण आहे. प्रार्थनास्थळाला कोणत्याही प्रकारची परवानगी पालिकेनी दिलेली नाही. कायदेशीर कारवाई करून अनधिकृत बांधकाम तात्काळ काढले जाईल असेही महापालिका आयुक्त सुनील पवार यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या आयशर टेम्पोचा भीषण अपघात

Breaking : धक्कादायक! मुंबई, नागपूरसह ४ कोर्टाला बॉम्बने उडवण्याची धमकी, राज्यात खळबळ

Five Hundred Rupees Note: ५०० रुपयांच्या नोटेवर किती भाषा असतात?

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो eKYC झाली का? फक्त १२ दिवसांचा वेळ, वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Accidents : पुण्यात भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू, जालना अन् बुलडाण्यात भयंकर दुर्घटना, राज्यात ७ जण ठार

SCROLL FOR NEXT