Raj Thackeray on Vidhan Sabha Election Saam TV
महाराष्ट्र

Raj Thackeray : विधानसभा निवडणुकांसाठी भाजपला पाठिंबा नाही; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

Raj Thackeray on Vidhan Sabha Election : मी फक्त लोकसभा निवडणुकीसाठीच भाजपला पाठिंबा जाहीर केला होता. तेव्हा विधानसभेच्या पाठिंब्याचं कुठेही बोललो नव्हतो. त्यामुळे आता युतीचा विषयच येत नाही, असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

Satish Daud

मी फक्त लोकसभा निवडणुकीसाठीच भाजपला पाठिंबा जाहीर केला होता. तेव्हा विधानसभेच्या पाठिंब्याचं कुठेही बोललो नव्हतो. त्यामुळे आता युतीचा विषयच येत नाही, असं स्पष्ट करत राज ठाकरे यांनी आगामी निवडणुकीत 'एकला चलो'चा नारा दिला. इतकंच नाही, तर यावेळी त्यांनी विधानसभेसाठी मनसेचे दोन उमेदवार देखील जाहीर केले. शिवडी येथून बाळा नांदगावकर आणि पंढरपूरमधून दिलीप धोत्रे मनसेकडून विधानसभेची निवडणूक लढवणार, असंही राज ठाकरेंनी सांगितलं.

आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे अॅटिव्ह झाले असून त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. आज राज ठाकरे (Raj Thackeray) हे सोलापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी बोलताना त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधताना विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. याशिवाय आरक्षणावर देखील मोठं भाष्य केलं.

'विधानसभेत मनसे स्वबळावर लढणार'

माध्यमांसोबत बोलताना राज ठाकरे म्हणाले, "लोकसभा निवडणुकीवेळी महायुतीला पाठिंबा देताना मी हा पाठिंबा केवळ नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना देतो आहे, असं स्पष्ट केलं होतं. तेव्हा मी विधानसभेच्या पाठिंब्याबाबत कुठंही बोललो नव्हतो. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत युतीचा विषयच येत नाही".

राज ठाकरे यांची शरद पवारांवर टीका

यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर देखील टीका केली. महाराष्ट्रात महाराष्ट्रात मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण करायला शरद पवार यांनी हातभार लावू नये, असं राज ठाकरे म्हणाले. शरद पवार यांचं आजपर्यंतचं राजकारण पाहता त्यांना महाराष्ट्राचा मणिपूर झालेला हवाय की नकोय, याबाबत काहीच समजत नाही, असा टोलाही राज ठाकरे यांनी लगावलाय.

'महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही'

राज ठाकरे यांनी आरक्षणाच्या विषयावर देखील भाष्य केलं. महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही, असं राज ठाकरे म्हणाल. मराठा ओबीसी वाद हे मताचे राजकारण आहे. लहान लहान मुळे आरक्षणामुळे आमची मैत्री तुटली असं सांगतात, हे चित्र भीषण आहे, महाराष्ट्रात असे चित्र कधीच नव्हते, अशी खंतही राज ठाकरे यांनी व्यक्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: परळीत ५० हजार मतांनी धनंजय मुंडे आघाडीवर

Cardamom Benefits: बहुगुणी वेलचीचे 'हे' फायदे तुम्हाला माहित आहे का?

Jharkhand Election Result: झारखंडमध्ये भाजपला धक्का, इंडिया आघाडीनं बहुमत गाठलं, कुणाला किती जागांवर आघाडी?

IND vs AUS 1st Test: लाईव्ह सामन्यात हर्षित राणा अन् मिचेल स्टार्क भिडले! नेमकं काय घडलं? -VIDEO

Vidhan Sabha Election Results : सुरुवातीच्या कलात भाजपने गाठलं शतक!

SCROLL FOR NEXT