Raj Thackeray reacts sharply on Maharashtra politics after Sunetra Pawar’s swearing-in as Deputy Chief Minister. Saam Tv
महाराष्ट्र

राजकारणाचा विचका झालाय; राष्ट्रवादीचा अध्यक्ष 'पाटील' असावा, पटेल नाही, सुनेत्रा पवारांनी शपथ घेताच राज ठाकरेंची पोस्ट

Raj Thackeray Reaction After Sunetra Pawar Oath: सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्टद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर प्रतिक्रिया दिली आहे.

Omkar Sonawane

राज्याच्या राजकारणात आज एक ऐतिहासिक घडामोड घडली. महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा अजित पवार यांनी शपथ घेतली. राजभवनामध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा सोहळा पार पडला. त्यापूर्वी राष्ट्रवादी पक्षाच्या आमदारांच्या बैठकीमध्ये त्यांची गटनेता म्हणून देखील निवड करण्यात आली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पक्षाच्या विधिमंडळ नेता निवडीसाठी आज दुपारी 2 वाजता बैठक पार पडली आणि एकमताने सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला.

त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. मोजक्या नेत्यांच्या उपस्थितीत अत्यंत साधेपणाने आणि कमी लोकांमध्ये हा शपथविधीचा कार्यक्रम पार लोकभवनमध्ये पडला. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा पवार यांना मंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या कार्यक्रमासाठी राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव आणि राजशिष्टाचार अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान सुनेत्रा पवार यांनी शपथ घेताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबूकवर पोस्ट करत प्रतिक्रिया दिली.

राज ठाकरे पोस्टमध्ये नेमके काय म्हणाले?

महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या काही काळात पार विचका झाला आहे. त्यावर खरंतर भाष्य पण करावं असं वाटत नाही. पण तरीही आज दिवसभर ज्या घडामोडी सुरु आहेत त्यावर बोलावंच लागेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या अस्सल मराठमोळ्या मातीतला, आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा कोणीही मराठी असावा, पाटील असावा पण पटेल नाही ! अशी थेट प्रतिक्रिया राज ठाकरे दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : लग्नाच्या २८ व्या दिवशी बायको २ महिन्यांची गरोदर; अल्ट्रासाऊंड रिपोर्ट बघितला अन् नवऱ्याला शॉकच बसला

Maharashtra Live News Update: केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा असलेल्या शिक्षकांची इलेक्शन ड्युटी होणार रद्द

Horoscope Sunday: पैसा खर्च होईल, ५ राशींना आरोग्याकडे द्यावे लागेल लक्ष, वाचा रविवारचे राशीभविष्य

सुनेत्रा पवार यांना अर्थ खाते नाही; कोणती खाते मिळाली? VIDEO

अर्थशास्त्रात पदवीधर ते ४ विशेष कलागुणांमध्ये पारंगत; राजकारणाच्या पलिकडल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT