Raj Thackeray Saam Digital
महाराष्ट्र

Raj Thackeray : राज ठाकरेंचा स्वबळाचा नारा, 'मनसेला यंदा सत्तेत बसवणारच'; राज ठाकरेंची मोठी घोषणा

Sandeep Gawade

तन्मय टिल्लू, साम टीव्ही प्रतिनिधी

आगामी विधानसभा निवडणुकीत राज ठकारेंची मनसे महायुतीसोबत लढणार की स्वबळावर मैदानात उतरणार याची सा-या महाराष्ट्राला उत्सुकता लागली होती. मात्र अखेर राज ठाकरेंनी आपल्या पदाधिका-यांच्या मेळाव्यात आगामी विधानसभेतली रणनीती उघड केलीय. एवढंच नव्हे तर राज ठाकरेंनी सत्तेत येण्याचा निर्धारही व्यक्त केलाय. काय आहे राज ठाकरेंचं सत्तेचं गणित? मनसे किती जागा आणि कुणासोबत लढवणार? यावरचा हा विशेष रिपोर्ट...

लोकसभा निवडणुकीत भाजपाला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. मुंबईतल्या मनसे राज्यभरातून आलेल्या पदाधिका-यांच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी थेट स्वबळाचा नारा दिलाय. आगामी विधानसभा निवडणुकीत 225 ते 250 जागा लढवणार असल्याची घोषणा राज ठाकरेंनी केली. एवढंच नव्हे तर मनसेला कोणत्याही परिस्थितीत सत्तेत बसवणार असल्याचा निर्धारही त्यांनी केला.

2019 च्या लोकसभेत राज ठाकरेंनी मोदींविरोधात प्रचार केला होता. आणि विधानसभेत स्वबळावर निवडणूक लढवली होती. मात्र एकाच जागेवर मनसेला यश आलं होतं. तर 2024च्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी मोदींचा प्रचार केलाय. त्यात आता त्यांनी स्वबळाची भाषा केलीय. मात्र निवडणुकीपूर्वी वेगळी समीकरणं तयार झाली तर राज ठाकरे महायुतीतही निवडणूक लढवण्याची शक्यता कायम आहे. सध्या मनसेनं कशी तयारी सुरू केली आहे ते पाहूयात...

मनसेची स्वबळाची तयारी

मनसे 225 ते 250 जागा लढवणार

मनसे नेत्यांची निरीक्षक म्हणून राज्यभरात नियुक्ती

मनसे नेत्यांकडून मतदारसंघाची चाचपणी

मतदारसंघातील आढाव्यानंतर राज ठाकरेंचा दौरा

निवडून येण्याच्या क्षमतेवर तिकीट वाटप

पारदर्शक माहिती देण्याच्या सर्व्हे टीमला सूचना

राज ठाकरे कधी विरोधकांची भाषा बोलतात तर कधी सत्ताधाऱ्यांना जवळ करतात. त्यामुळे त्यांच्यावर सातत्यानं टीका होते. आगामी विधानसभेसाठी राज ठाकरेंनी सध्या एकला चलो रेची भूमिका घेतलीय. मात्र राज ठाकरे स्वबळावर लढले तर कुणाला फायदा आणि कुणाला तोटा होईल यावर आघाड्या आणि बिघाड्यांची गणितं अवलंबून आहेत. मात्र गेल्या 10 वर्षांपासून केवळ 1 आमदार असलेल्या मनसेला कोणती भूमिका फायद्याची आहे यावर राज ठाकरेंचं राजकीय समीकरण ठरणार यात शंका नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

SCROLL FOR NEXT