Raj Uddhav Thackeray X
महाराष्ट्र

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या मनातलं घडतंय? वाढदिवसानिमित्त ठाकरे बंधूंची भेट 'मातोश्री'च्या भेटीमागची इनसाईड स्टोरी

Thackeray Brothers : राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट घेत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेत..मात्र 20 मिनटांच्या या भेटीमागची इनसाईड स्टोरी काय आहे? बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये काय चर्चा झाली?

Suprim Maskar

Raj Uddhav Thackeray : ठाकरे बंधूंची युती कधी होणार याकडे अनेक जण डोळे लावुन बसले असताना रविवारी युतीच्या दिशेने आणखी एक पाऊल पडल्याची घटना घडली. अनेक वर्षानंतर राज ठाकरेंची पावलं मातोश्रीकडे वळलायीते. याला निमित्त ठरलं उद्धव ठाकरेंचा 65 वा वाढदिवस..यानिमित्त मातोश्रीचा परिसर सकाळपासूनच गजबजलेला होता. अनपेक्षितपणे राज ठाकरे शिवतीर्थावरून मातोश्रीकडे रवाना झाले आणि एकच जल्लोष झाला. मनसे आणि ठाकरेसेनेच्या नेत्यांनी मोठ्या उत्साहात राज ठाकरेचं मातोश्रीत स्वागत केलं. गुलाबाचा गुच्छ देत राज ठाकरेंनी आपले मोठे बंधू उद्धव यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर राज यांनी बाळासाहेबांच्या आसनाला अभिवादन केलं.

ठाकरे बंधूंच्या भेटीत काय घडलं?

  • वरळीतील विजयी मेळाव्यानंतर 22 दिवसांनी ठाकरे बंधूंची पुन्हा भेट

  • मातोश्रीवर राज आणि उद्धव यांच्यात 20 मिनिटं बंद खोलीत चर्चा

  • बाळासाहेबांच्या खोलीत दोन्ही भावांमध्ये चर्चा

  • बाळासाहेबांनी काढलेल्या व्यंगचित्रावर चर्चा केल्याची माहिती

  • जुन्या आठवणींना उजाळा दिला

राज ठाकरेंबरोबर यावेळी बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई हे मनसचे नेते होते. विशेष म्हणजे मातोश्रीवरील भेटीनंतर राज ठाकरेंनी या भेटीची पोस्ट करून उद्धव यांचा शिवसेना प्रमुख असा उल्लेख केला.. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनीही राज यांच्या भेटीमुळे आनंद द्विगुणित झाल्याचं म्हटलंय. दरम्यान ठाकरे बंधूंची युती झाली, असं विधान ठाकरे सेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी केलयं...

दुसरीकडे ठाकरे बंधूंनंतर ज्युनिअर ठाकरेही पुन्हा एकदा एकत्र दिसले..पोलीस कॅम्पच्या गणपतीच्या पाद्यपूजनाच्या वेळेस अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे दोन्ही भाऊ एकत्र आले. हिंदीची सक्ती विरोधात मराठीच्या मुद्यावरुन ठाकरे बंधू विजयी मेळाव्यात एकत्र आले. त्यानंतर पुन्हा एकत्र आल्याने महाराष्ट्राच्या राजकारणाचा नवा अध्याय सुरु झाला असून महाराष्ट्राच्या मनातलं घडतयं, अशी चर्चा आहे. ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी राजकीय मनोमिलनाचे संकेत देतायत. आता दोन्ही पक्षांच्या युतीची अधिकृत घोषणा कधी होतेय? याकडे राज्याचं लक्ष लागलयं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: हिंगोलीकरांसाठी आनंदाची बातमी, जिल्ह्यातील तिन्ही मोठे धरणं भरले

Railway News : बाकी डबेसोडून रेल्वेचं इंजिन पळालं पुढे; रेल्वेचं कपलिंग अचानक तुटलं

Hingoli Flood: नांदेडमध्ये पूराचं संकट कायम, कयाधू नदीचं पाणी शेतात शिरलं; बळीराजा चिंतेत

मुलींना वयाने मोठे पुरुष का आवडतात? कारणे जाणून घ्या

GK: मृत व्यक्तीच्या फोटोसमोर अगरबत्ती लावावी की नाही?

SCROLL FOR NEXT