Maharashtra Politics  x
महाराष्ट्र

Maharashtra Politics : राज्यात मोठी उलथापालथ होणार? राज ठाकरेंना शिंदे गटाकडून निमंत्रण

Maharashtra Political News : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये युतीसाठी चर्चा सुरु आहेत. अशातच शिंदे गटाकडून राज ठाकरे यांना निमंत्रण मिळाल्याने चर्चांना उधाण आले आहे.

Yash Shirke

  • राज ठाकरे - उद्धव ठाकरे यांच्यात युतीसाठी चर्चा सुरु असल्याचे पाहायला मिळते.

  • युतीच्या घोषणेआधी एकनाथ शिंदे गटाकडून राज ठाकरेंना निमंत्रण मिळाले आहे.

  • शिंदे गटाकडून राज यांना निमंत्रण मिळाल्याने नव्याने चर्चा सुरु झाल्या आहेत.

Maharashtra : हिंदी सक्तीविरोधात तब्बल २० वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र आले. मनसे आणि ठाकरे गटाने एकत्रितपणे मेळावा साजरा केला. आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी राज आणि उद्धव यांच्यात युती होईल असे म्हटले जात आहे. पण अशातच एकनाथ शिंदे गटाकडून राज ठाकरे यांना जेवणाचे निमंत्रण मिळाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.

रंगशारदा सभागृहात पार पडलेल्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी युतीबाबत घोषणा केली. मनसे-ठाकरे गट एकत्र येण्याची काळजी करु नये, योग्य वेळी युतीची घोषणा केली जाईल, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे म्हणाले. यादरम्यान राज ठाकरेंना शिंदेंच्या शिवसेनेकडून जेवणासाठी निमंत्रण मिळाले असल्याची माहिती मंत्री शंभूराजे देसाई यांनी दिली आहे.

'मनसे आणि शिवसेना यांची युती होईल की नाही हे लवकरच समजेल. एका बाजूला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे बोलणे सुरु आहे. दुसऱ्या बाजूला आम्हीही राज यांना जेवणासाठी आमंत्रित केले आहे. आम्ही त्यांना निमंत्रण दिलेले आहे. ते कधी येतील याची आम्ही वाट पाहत आहोत. याबाबत आम्ही एक-दोन दिवसांत एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करु', असे वक्तव्य शंभूराजे देसाई यांनी केले आहे.

भाजप आमदार परिणय फुके यांनी 'शिवसेनेचा बाप मीच आहे', असे वादग्रस्त वक्तव्य केले. या वक्तव्यामुळे शिंदेसेनेतील कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 'परिणय फुके यांनी केलेले वक्तव्य योग्य नाही, कोणी कोणाचा बाप नाहीये, इथे सगळे समान आहेत. तीन पक्ष महायुतीत मिळून सरकार चालवत आहेत. कुणीही कोणाचा बाप काढू नये', अशी प्रतिक्रिया देसाई यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मंत्रालय परिसरात झाडाची फांदी पडून पोलीस कॉन्स्टेबल जखमी

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या ३ सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार, 'वीकेंड का वार'ला कोण जाणार घराबाहेर?

Aadhaar Card Update : आधार कार्डधारकांसाठी मोठी बातमी! UIDAIने बदलली Face Authenticationची पद्धत, असा होणार फायदा

Gold Rate : गणेशोत्सवात सोनं खरेदीदारांना दिलासा! १० तोळे ९२०० रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 22k, 24k, 18k चे आजचे ताजे दर

Chocolate Modak vs Mawa Modak: चॉकलेट मोदक की मावा मोदक? यंदाच्या गणेशोत्सवात लहान मुलांसाठी बनवा हे दोन्ही मोदक

SCROLL FOR NEXT