Raj Thackeray  saam tv
महाराष्ट्र

Raj Thackeray: शिवसेना नाव आणि चिन्ह शिंदे गटाकडे, राज ठाकरेंचे पहिले ट्विट, म्हणाले; आज पुन्हा....'

या महत्वपुर्ण निर्णयानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Gangappa Pujari

Mumbai: शिवसेना पक्ष ( shivsena Party ) आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला मिळाले आहे. उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांच्या गटाला हा मोठा धक्का आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निकाल जाहीर केला आहे. या महत्वपुर्ण निर्णयानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)

काय म्हणाले राज ठाकरे...

निवडणुक आयोगाच्या निर्णयानंतर शिंदे गटाकडून मोठा जल्लोश केला जात आहे. शिंदे गटांच्या कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आतषबाजी केली जात आहे. या निर्णयानंतर राज ठाकरेंचे ट्विट व्हायरल होत आहे.

या व्हायरल ट्विटमधून राज ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणाची एक ३० सेकंदाची क्लिप पोस्ट केली आहे. ज्यामध्ये "नाव आणि पैसा, पैसा येतो पैसा जातो पण एकदा गेलेलं नाव पुन्हा येत नाही," असा संदेश दिला आहे. या पोस्टसोबत त्यांनी" बाळासाहेबांनी दिलेला ‘शिवसेना’ हा विचार किती अचूक होता ते आज पुन्हा एकदा कळलं," असा कॅप्शनही दिला आहे.

दरम्यान, या निर्णयानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी "हा बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा विजय झाला आहे. तसेच हा भारतीय घटनेचा आणि लोकशाहीचा विजय आहे, लोकशाहीत बहुमताला महत्व असते, त्यामुळे जो संघर्ष केला, बाळासाहेबांची विचार भूमिका घेवून सत्ता स्थापन केली. त्याचा हा विजय आहे," अशी प्रतिक्रिया दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor Passes Away: प्रसिद्ध अभिनेत्याचा हॉटेलमध्ये आढळला मृतदेह; चित्रपटसृष्टीत खळबळ, पोलिसांचा तपास सुरु

विरार-डहाणू लोकलमध्ये तुफान राडा! पुरुष प्रवाशांनी एकमेकांना अक्षरशः तुडवलं; व्हिडिओ झाला व्हायरल

Maharashtra Live News Update : ग्रँडमास्टर दिव्या देशमुखचा नागपुरात नागरी सत्कार सोहळा

ChatGPTचं नवं फीचर! विद्यार्थ्यांना अभ्यासात होणार मदत; कशी? वाचा सविस्तर

Dhadak 2 : सिद्धांत चतुर्वेदी अन् तृप्ती डिमरीची अनोखी प्रेमकथा, वाचा 'धडक 2' चं ओटीटी अपडेट

SCROLL FOR NEXT