Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis speaks on the political impact of the Thackeray brothers’ alliance ahead of municipal elections. Saam Tv
महाराष्ट्र

राज ठाकरे सर्वात मोठे लूजर ठरणार, फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

Devendra Fadnavis Prediction On Raj Thackeray: ठाकरेंच्या युतीत राज ठाकरे मोठे लूजर ठरणार असल्याचं भाकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वर्तवलंय. मुख्यमंत्री असं का म्हणाले आणि ठाकरेंच्या युतीमुळे महायुतीपुढे आव्हान किती आहे?

Suprim Maskar

भाजपला रोखण्यासाठी ठाकरे बंधूंनी महापालिका निवडणुकीत एकत्र येण्याचा निर्णय घेतला... अशातच राज ठाकरेंच्या बदलत्या भूमिकेवर आणि उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीवर बोलताना फडणवीसांनी राज ठाकरेंना लूजर म्हटलयं... इतकचं काय ठाकरे बंधूंच्या युतीत कोणाचा फायदा होणार आणि कोणाचा तोटा याबद्दलही फडणवीसांनी नवं भाकित केलयं...

दुसरीकडे भाजप सत्तापिपासू असून सत्तेसाठी त्यांची चढाओढ सुरू आहे, असं म्हणत मनसे नेते अविनाश अभ्यंकरांनी फडणवीसांच्या टीकेला चांगलच प्रत्युत्तर दिलयं...

शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरेंच्या मनसेनं मराठी माणसाचा मुद्दा आक्रमकपणे मांडला...मग मोदींच्या गुजरात मॉडेलचे समर्थन करणारे राज ठाकरे 2014 नंतर भाजपचे टीकाकार झाले...त्यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत लाव रे तो व्हिडिओच्या माध्यमातून मोदी- शाहांवर त्यांनी सडकून टीकाही केली...मात्र 2020 ला पक्षाचा झेंड्याचा रंग बदलून राज ठाकरेंनी हिंदूत्वाची शाल पांघरत मशिदींवरील भोंग्याचा मुद्दा लावून धरला... त्यानंतर 2024 च्या लोकसभा निवडणुकीत यू-टर्न घेत मोंदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला...

राज ठाकरेंच्या या बदलत्या भूमिकांचा निवडणुकीत मनसेला फायद्याएवजी तोटाच अधिक झाल्याचं समोर आलंय. महापालिका निवडणुकीत मराठीच्या मुद्यावरून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेत. त्यामुळे महापालिका निवडणुकीत लूजर या टीकेला राज ठाकरे संख्याबळानं उत्तर देणार का? हे पाहणं महत्त्वाचं आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मशाली'वर निवडून आले, पण आदेश मोडले; बेपत्ता ४ नगरसेवकांवर ठाकरेंचा निलंबनाचा इशारा

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प कोण सादर करणार? CM देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

Saturday Horoscope : आयुष्यात मोठं काही तर घडणार; ५ राशींच्या लोकांनी घराबाहेरच्या व्यक्तीचा सल्ला घेऊ नये, अन्यथा...

अमेरिकेचा इराणवरील हल्ल्याचा सिक्रेट प्लॅन? अमेरिका-इराणमध्ये महायुद्ध पेटणार?

काँग्रेस-MIMच्या नगरसेवकांमध्ये राडा, अकोल्यात भाजपचाच महापौर

SCROLL FOR NEXT