भरत मोहोळकर, साम टीव्ही
मुंबई : औरंगजेबाच्या कबरीच्या वादाने पुन्हा एकदा राजकारण पेटलंय. या वादात आता राज ठाकरेंनी उडी घेतलीय. औरंगजेबाची कबर नाही तर कबरीभोवतीची सजावट हटवा. कारण औरंगजेबाच्या कबरीमुळे मराठ्यांच्या पराक्रमाचा इतिहास असं म्हणत कबर हटवण्याला विरोध केला. तर फडणवीसांनीही राज ठाकरेंना सडेतोड उत्तर दिलंय.
राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेचं एमआयएमने स्वागत केलंय. तर वाद पेटवणाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेण्याचा सल्लाही इम्तियाज जलील यांनी दिलाय. तर औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी आक्रमक भूमिका घेतलेल्या भाजपचे संघानेच कान टोचलेत.
औरंगजेबाची कबर हटवण्याला भाजपने हवा दिली होती. एवढंच नाही तर भाजपच्या नेत्यांकडून कबर हटवण्याबद्दल उघड भूमिका घेतली जात होती. त्यातच आता हिंदूत्ववादी पक्ष असलेल्या मनसेने आणि भाजपची मातृसंघटना असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही भाजपच्या विरोधात भूमिका घेतलीय.. त्यामुळे भाजप आतातरी कबरीचा मुद्दा सोडून राज्यातील इतर महत्वाच्या प्रश्नांकडे लक्ष देणार का? याकडे लक्ष लागलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.