Uday Samant on Raj Thackeray Uddhav Thackeray Alliance Saam Tv News
महाराष्ट्र

Maharashtra Politics : राज्याचं राजकीय समीकरण बदललं, 'ठाकरे'च विरोधी पक्षाचा चेहरा? VIDEO

Uddhav Thackeray News : प्रचंड बहुमत मिळालेल्या महायुतीसमोर आता ठाकरे बंधू विरोधी पक्षाचा चेहरा म्हणून समोर आलेत... मात्र यामागचं समीकरण नेमकं काय आहे? पाहूयात....

Bharat Mohalkar

हिंदीसक्तीच्या निर्णय रद्द झाल्याच्या विजय मेळाव्यातील ठाकरेंच्या एकीची ही दृश्य....यातूनच ठाकरे बंधूंनी युतीचा स्पष्ट संदेश दिलाय. या विजयी मेळाव्यातून महाराष्ट्रात ठाकरे बंधू हाच विरोधी पक्षाचा चेहरा म्हणून समोर आलाय.

खरंतर विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड मोठं बहुमत मिळालं.. तर ठाकरे सेना आणि मनसेसह काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीचीही मोठी पिछेहाट झाली...मात्र सरकारने हिंदीसक्तीचा निर्णय घेतला आणि प्रचंड बहुमतातील सरकारला मराठी जनतेनं नमवलं.... नेमका हाच धागा पकडून राज ठाकरेंनी सरकारला इशारा दिलाय.

मात्र आता ठाकरेंनी रस्त्यावर संघर्ष करण्याचा इशारा दिल्याने ठाकरे बंधूंच्या रुपाने विरोधी पक्षाची ताकद वाढणार आहे... ती नेमकी कशी? पाहूयात.....

विधानसभेत मुंबईत मनसेला 7 तर ठाकरे सेनेला 23 टक्के मतं

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पडझडीमुळे ठाकरे बंधूंना सक्षम विरोधक म्हणून पुढे येण्यास वाव

बहुमताच्या बळावर काही निर्णय लादल्यास रस्त्यावरची लढाई लढणं शक्य

ठाकरेंच्या युतीमुळे मुंबई महापालिका निवडणुकीत चुरस येणार

एका सर्व्हेनुसार मुंबईत ठाकरे बंधूंच्या युतीला 52 टक्के लोकांचं समर्थन

एकीकडे विधानसभेत विरोधक शक्तीहीन बनल्याची चर्चा आहे... त्याच पार्श्वभुमीवर रस्त्यावरच्या लढाईतून हिंदीसक्तीचा निर्णय रद्द करण्यास भाग पाडणारे ठाकरे बंधू विरोधी पक्षाचा मोठा चेहरा म्हणून पुढे आलेत.... आता एकीची वज्रमूठ आवळून ठाकरे बंधू महायुतीच्या सरकारविरोधात रस्त्यावरची लढाई लढणार का? आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ही एकीचं बळ दाखवणार का? याकडे राज्याचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : दारू पिण्यावरुन वाद, थोरल्या भावाने धाकट्या भावाचा केला खून; पुण्यात भयंकर घडलं

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र कुस्तीगिर परिषदेच्या अध्यक्षपदी आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड

Devendra Fadnavis : महाराष्ट्राच्या मनात काय? आगामी निवडणुकीआधी CM देवेंद्र फडणवीसांनी केलं मोठं भाष्य

Aare Ware Beach : पावसाळ्यात 'आरे-वारे' बीचचं सौंदर्य फॉरेनपेक्षा कमी नाही

Pune Rave Party: आधी हॉटेलची रेकी, नंतर आखला एकनाथ खडसेंच्या जावयाला अडकविण्याचा डाव; खेवलकरांच्या वकिलांचा धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT