बंटी जहागिरदार हत्या प्रकरण_बॉम्बस्पोटातील आरोपी म्हणून पालकमंत्र्यांकडून भावाची बदनामी : रईस शेख
मुख्य सूत्रधार मोकाट_राजकीय वरदहस्तामुळे राजरोसपणे श्रीरामपूर शहरात फिरताय : रईस शेख
बॉम्बस्पोटातील आरोपी म्हणून पालकमंत्र्यांकडून भावाची बदनामी : रईस शेख
सचिन बनसोडे, साम टीव्ही
श्रीरामपूरमधील असलम शब्बीर शेख उर्फ बंटी जहागीरदार याच्या हत्या प्रकरणानंतर सुरू असलेल्या आरोपासंदर्भात त्याचे बंधू तथा नगरसेवक रईस शेख यांनी पत्रकार परिषद घेत आरोपांचे खंडन केले आहे. प्रसार माध्यमांसह पालकमंत्री विखे पाटील हे बंटी जहागीरदार यांची बॉम्बस्फोटातील आरोपी म्हणून जाणीवपूर्वक बदनामी करीत असल्याचा आरोप रईस शेख यांनी केलाय. तर हत्या प्रकरणाचे सूत्रधार राजरोसपणे शहरात फिरत असून पोलिस त्यांना अटक कधी करणार? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय.
बंटी जहागिरदार याच्या हत्येनंतर अंत्यविधीसाठी जमलेल्या मोठ्या जनसमुदायाच्या मुद्द्यावरून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पोलिस अधिकाऱ्यांसमोर संताप व्यक्त केला होता.. जर्मन बेकरी बॉम्बस्पोटातील आरोपीच्या अंत्यविधीसाठी हजारो लोक जमतात, देश कोणत्या दिशेने चाललाय?.. असा प्रश्न विखे पाटलांनी उपस्थित केला होता.
पालकमंत्र्यांचा वक्तव्यानंतर बंटी जहागिरदार याचे बंधू रईस शेख यांनी पत्रकार परिषद घेत, बंटी जहागीरदार यांचा पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाशी दुरान्वयानेही संबंध नसल्याचे म्हंटले आहे.. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत दाखवत रईस यांनी पुण्यातील जर्मन बेकरी आणि जंगली महाराज रोड बॉम्बस्पोटात बंटी जहागीरदार यांच्याविरोधात कोणतेही सबळ पुरावे नसल्याचे म्हटले आहे.
2010 साली झालेल्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणात एकूण सात आरोपी होते.. त्या यादीत बंटी जहागीरदार यांचे नाव नव्हते.. तरीही त्यांच्या हत्येनंतर काही राजकीय वक्तव्ये आणि माध्यमांमधून त्यांना बॉम्बस्फोटातील आरोपी म्हणून संबोधण्यात आल्याचा आरोप रईस जहागीरदार यांनी केला आहे.. कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय माझ्या भावाची बदनामी केली जात आहे.. हे कायदेशीर आणि मानवी दृष्टिकोनातून चुकीचे आहे.. पालकमंत्री विखे पाटलांनी चुकीचे वक्तव्य न करता सपूर्ण प्रकरणाची खात्री करावी असे आवाहन रईस शेख यांनी केले आहे.
दरम्यान, बंटी जहागीरदार याच्या हत्या प्रकरणात दोन्ही हल्लेखोरांना अटक करण्यात आली असली, तरी मुख्य सूत्रधार म्हणून सागर उर्फ चन्या बेग, आकाश उर्फ टिप्या बेग आणि सोनू उर्फ जयप्रकाश बेग यांची नावे पुढे येत आहेत.. तिघांवर हत्या, दरोडे, चैन स्नॅचिंग असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
संगमनेर येथे 2014 साली एका अल्पवयीन मुलीवरील बलात्कार केल्याचा गंभीर गुन्हा बेग बंधूवर दाखल असून, न्यायालयाने त्यांच्या विरोधात वॉरंटही बजावले आहे.. असे असतानाही हे आरोपी श्रीरामपूरमध्ये खुलेआम वावरत असून राजकीय कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असल्याचा आरोप रईस शेख/जहागीरदार यांनी केला आहे.. पोलिस यंत्रणा या आरोपींवर कारवाई कधी करणार? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे..
या प्रकरणाचा तपास करताना श्रीरामपूर पोलिसांवर राजकीय दबाव येऊ शकतो, त्यामुळे हा तपास SIT मार्फत व्हावा अशी मागणी बंटी जहागिरदार यांचे बंधू रईस शेख आणि मुझफ्फर शेख यांनी केली आहे. मुख्य सूत्रधारांना अटक न झाल्यास मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा शेख कुटुंबीयांनी दिला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.