ratnagiri, rain , rain update,  saam tv
महाराष्ट्र

रत्नागिरीत पावसाचा धुमाकुळ; प्रशासन सतर्क, मच्छीमारांना सावधनतेचा इशारा

येत्या 28 जून पर्यंत पावसाचा जाेर राहील असे प्रशासनाने कळविले आहे.

अमोल कलये

रत्नागिरीत : रत्नागिरीत (ratnagiri) आज (रविवार) सकाळ पासून पुन्हा एकदा पावसाला (rain) जोरदार प्रारंभ झाला आहे. रत्नागिरीत (ratnagiri latest marathi news) शनिवार सकाळ पासून पावसाची रिपरीप सुरु हाेती. रात्रभर पावसानं धुमाकुळ घातला होता. पहाटेच्या सुमारास पावसाचा जोर ओसरला होता. परंतु काहीश्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाने शहरास (city) झाेडपले आहे. (ratnagiri rain update)

गेल्या 24 तासांत रत्नागिरी जिल्ह्यात सरासरी 135.78 मिलीमीटर इतका पाऊस पडला आहे. सर्वाधिक पाऊस हा लांजा तालुक्यात पडला आहे. लांज्यात 275 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तर सर्वात कमी पाऊस खेडमध्ये 21 मिमी पडला आहे.

रत्नागिरीत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवलीय. तर 28 जून पर्यंत पावसाचा अलर्ट जारी केला गेलाय. कोकणात मुसळधार पावसाची शक्यता असल्यानं प्रशासनानं सतर्कतेचे आदेश दिलेत. समुद्रातील वा-याचा वेग देखील जास्त असल्यानं मच्छीमारांनी (fisherman) समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असे आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आलय.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Tourism : रिमझिम पाऊस अन् पांढराशुभ्र धबधबा, पुण्यात लपलंय अद्भुत सौंदर्य

Revdi Recipe: गूळ व तीळापासून तयार होणारी खमंग रेवडी एकदा घरी नक्की बनवा, नोट करा सिंपल रेसिपी

Pune : आषाढी एकादशीच्या दिवशी काळाचा घाला! पंढरपूरहून परतताना अपघात, टँकरची दुचाकीला धडक अन्...; हसताखेळता संसार उद्धवस्त

Food Digestion: खाल्लेले अन्न पचायला किती वेळ लागतो?

Farali Misal Recipe : झणझणीत फराळी मिसळ, उपवासाला एकदा करून तर बघा

SCROLL FOR NEXT