Maharashtra Rain
Maharashtra Rain  Saam Tv
महाराष्ट्र

मान्सूनच्या आधीच नांदेड जिल्ह्याला वादळी-वाऱ्यासह पावसाने झोडपले, हिंगोलीतही सरी कोसळल्या

साम टिव्ही ब्युरो

नांदेड : राज्यात मान्सूनच्या आधीच वादळी-वाऱ्यासह पावसाने हजेरी (Rain) लावली आहे. नांदेड (Nanded) जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झालीय. गेल्या काही महिन्यांपासून उष्माघाताने (Summer Hit) लाहीलाही झालेल्या नागरिकांना पावसाच्या गारव्यामुळं दिलासा मिळाला आहे. नांदेडसह मुदखेड, उमरी, अर्धापूर, माहूर तालुक्यातही पावसाचे आगमन झाल्याने बळीराजा (Farmer) सुखावला आहे. तर दुसरीकडे काढणीला आलेला भुईमूग आणि उन्हाळी सोयाबीन पिकांच नुकसान होण्याची भीतीही शेतकऱ्यांना सतावत आहे. खरीप हंगामात शेतीच्या कामांच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्याला मात्र वरुणराजाच्या आगमनाने दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, हिंगोली शहरातही आज सायंकाळी चार वाजताच्या सुमारास अचानक पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने उकाड्याने हैराण असलेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. पाऊस पडल्याने हिंगोली शहरातील रस्त्यावर पाणी साचले होते. दरम्यान, पुणे वेधशाळेने वर्तविलेल्‍या अंदाजानुसार गोंदिया जिल्‍ह्यातही गेल्या आठवड्यात पावसाने हजेरी लावली.

नैऋत्य मोसमी वाऱ्यांची (Gondia) हालचाल मंदगतीने सुरू असून मोसमी वारे पुढच्या दोन ते तीन दिवसांत केरळ प्रांतात दाखल होतील,असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला होता. मोसमी वारे दाखल होण्याच्या या कालावधीत राज्यातील काही भागांमध्ये मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यांसह पावसाच्या हलक्या सरी (Rain) पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : कुर्ला स्क्रॅप मार्केटमधील असलेल्या गोदामाला आग

IPL 2024 CSK vs RR: चेन्नईच्या विजयानं आरसीबीचं टेन्शन वाढलं; ५ गडी राखत केला राजस्थानचा पराभव

Sambhajinagar News | संभाजीनगरमध्ये गर्भलिंग निदान सेंटरवर छापा

Special Report : Kal Maharashtra | पियुष गोयल भाजपचा गड राखणार?

Saam Tv Video Fact Check | 'साम' टीव्हीच्या नावाने खोटा व्हिडीओ व्हायरल!

SCROLL FOR NEXT