Rantnagiri Rain  Saam Tv
महाराष्ट्र

Ratnagiri Rain Update: रत्नागिरीत पावसाचा जोर वाढला, जनजीवन विस्कळीत; काजळी, अर्जुना आणि कोदवली नदीला पूर

Priya More

अमोल कलये, रत्नागिरी

Ratnagir News: रत्नागिरी जिल्ह्यात सध्या पावसाची जोरदार (Ratnagiri Rainfall) बॅटिंग सुरू आहे. जिल्ह्यातीस सर्वच तालुक्यामध्ये अतिवृष् होत आहे. रत्नागिरीला पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. गेल्या 24 तासांत तब्बल 144 मिलिमीटर पाऊसाची नोंद झाली आहे.

रत्नागिरी तालुक्यात तब्बल 177 मिमी, लांजा तालुक्यात 169 मिमी, संगमेश्वर 157 मिमी, मंडणगड आणि गुहागरमध्ये 143 मिमी पाऊस झाला आहे. जूनपासून आतापर्यंत 1980 मिमी सरासरी इतका पाऊस जिल्ह्यात झाला आहे. मागच्यावर्षी 1694 इतका सरासरी पाऊस झाला होता. मागच्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी आतापर्यंत सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.

मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे रत्नागिरीतल्या नदी, नाले अक्षरश: दुथडी भरून वाहत आहेत. जिल्ह्यातील प्रमुख आठ नद्यांपैकी तीन नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. खेडमधील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदीची सध्याची पाणी पातळी ही 7.10 मीटर इतकी आहे. त्या पाठोपाठ संगमेश्वरमधील शास्त्री नदी 7 मीटर, काजळी नदी 17.46 मीटर, राजापूर मधील कोदवली नदी 6.80 मीटर तर भावनदी 9.95 मीटरवर इशारा पातळी ओलांडून वाहत आहेत.

रत्नागिरीतील काजळी नदीला पूर आला आहे. नदीचे पाणी पात्राबाहेर आले असून आजूबाजूच्या परिसरामध्ये पुराचे पाणी शिरले आहे. सोमेश्वर - काजरघाटी या नदीलगतच्या भागांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. या भागातील शेती पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे. तर काजरघाटी - सोमेश्वर रस्त्यावरून पाणी जात असल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. तर चांदोराई येथील बाजारपेठ पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे. या बाजारपेठेत 68 दुकान आहेत. कालपासून ही दुकानं पाण्याखाली आहेत. रत्नागिरी - देवधे मार्गावर चांदेराईत पाणी आल्याने या मार्गावरची वाहतूक बंद करण्यात आली आहे.

राजापूरमधील अर्जुना आणि कोदवली नद्यांना देखील पूर आला आहे. नदीचे पाणी शहरातील जवाहर चौकात शिरलं आहे. त्यामुळे राजापूर शहरातील जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे. प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

लांजा तालुक्यात पावसाचा जोर वाढताना पहायला मिळत आहे. काजळी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे नदीकाठच्या सखल भागात पाणी शिरले आहे. अंजणारीतील दत्त मंदिर पाण्याखाली गेले आहे. मंदिराच्या सभोवती पुराचं पाणी पहायला मिळत आहे. अशामध्ये आजही रत्नागिरीमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सतत पडणाऱ्या पावसाचा फटका मुंबई-गोवा महामार्गाला देखील बसला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरती दरड कोसळल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. महामार्गाचा चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे या मार्गावरची दगड आणि माती मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती आली होती. परिणामी मार्गावरची वाहतूक बंद करण्यात आली होती. मात्र दोन जेसीबीच्या साहाय्याने दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात आले. तब्बल दोन तासानंतर मार्गावरची वाहतूक पुन्हा एकदा सुरू झाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Virat Kohli Wicket: विराट कोहली आऊट नव्हताच! मात्र एका चुकीमुळे माघारी परतावं लागलं, Rohit भडकला -VIDEO

MNS News : 'मराठी माणसाला काम देणार नाही' म्हणणाऱ्याला मनसे स्टाईल चोप!

Maharashtra News Live Updates : शिरुरमधील साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत राडा

Pune CCTV Footage : रस्ता खचला, पुणे पालिकेचा ट्रक खड्ड्यात गाडला गेला; थरारक VIDEO

Medical College : वैद्यकीय शिक्षण महागलं, 5 पट शुल्क वाढ!

SCROLL FOR NEXT