bhandara saam tv
महाराष्ट्र

Bhandara News : भंडा-यात रस्त्यांची चाळण, नागरिकांच्या घरात पाणी शिरलं; पालिका लक्ष देईल का ?

Bhandara Rain Update : भंडा-यात पावसाचा जाेर वाढल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Siddharth Latkar

- शुभम देशमुख

Bhandara News : सतत पडत असलेल्या पावसामुळे भंडारा शहरातील रस्त्यांची चाळण झाली आहे. भंडा-यातील (bhandara) रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे छाेटे छाेटे अपघात घडू लागले आहेत. दरम्यान भूयारी गटार याेजनेसाठी खणलेल्या खड्डयांत पाणी साचत आहे. त्यातूनच अनेकांच्या घरात हे पाणी शिरत आहे. (Maharashtra News)

भंडारा जिल्ह्यात पावसाने (bhandara rain) दमदार हजेरी लावली असल्याने भंडारा शहरातील अनेक रस्ते चीखलमय झाले आहेत. शहरात भूमिगत गटार योजनेचे कामे सुरू असून रस्ता खोदकाम करण्यात आले आहे. रस्त्यांवर पाणी साचल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे.

राजेंद्र नगर, चरण पार्क या वॉर्डातील रस्त्यांची चाळण झाली असल्याने नागरिकांना जाणे येणे सुध्दा कठीण झाले आहे. इतकेच नाही तर अनेकांच्या घरात पाणी शिरले असल्याने नागरिकांनी बकेटच्या सहायाने घरातील पाणी काढले आहे. याबाबत वारंवार तक्रार नगरपरिषदेला करण्यात आली मात्र नगर परिषद याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरीक करत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाआघाडीत भूकंप; शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडणार? तिसऱ्या आघाडीसोबत जाण्याचा निर्णय

Maratha Reservation: मराठा आरक्षणाचा परिणाम, EWS प्रवेशाला फटका, 'SEBC'कडे विद्यार्थ्यांचा वाढता कल

Maharashtra Live News Update: राज्यात थंडीला सुरुवात होण्याची शक्यता

Zohran Mamdani: अमेरिकेत राजकीय उलथापालथ, भारतीय वंशाच्या नेत्याचा डोनाल्ड ट्रम्प यांना जोरदार धक्का, नेमकं प्रकरण काय?

Success Story : कोरडवाहू शेतकर्‍याचा मुलगा झाला अधिकारी! MPSC मध्ये महाराष्ट्रात टॉप १० मध्ये, अख्खा गावात जल्लोष

SCROLL FOR NEXT