rain hits akola police bharti postponed know the details  Saam Digital
महाराष्ट्र

Police Bharti 2024 : पोलिस भरती प्रक्रियेत मोठा बदल, अकोल्यात १००० उमेदवारांची शारीरिक चाचणी रद्द

akola police bharti postponed know the details :Anchor : अकोला पोलिस दलात 195 पोलिस शिपाई पदासाठी भरती प्रक्रिया 19 जून पासून सुरु झाली. पाेलिस भरतीची प्रक्रियेत आज पोलिस मुख्यालय येथील मैदान तसेच वसंत देसाई स्टेडियम मैदानावर शारीरीक चाचणी हाेणार हाेती.

Siddharth Latkar

- अक्षय गवळी

अकाेला येथे शुक्रवारी रात्रीच्या सुमारास आणि आज (शनिवार) पहाटे झालेल्या पावसामुळे अकोला पोलिस दलाने पाेलिस भरती प्रक्रियेत बदल केला आहे. आजची (ता. 22 जून) हाेणारी तब्बल 1 हजार उमेदवारांची मैदानावरील शारीरीक चाचणी रद्द केली. त्यानंतर पाेलिस दलाने नवे वेळापत्रक जाहीर केले.

पाेलिस भरती प्रक्रिया 8 जुलैपर्यंत आहे. ती एक दिवस पुढे गेली आहे. आजच्या पावसामुळे आज रोजी आलेल्या उमेदवारांना शारीरीक चाचणीसाठी पुढील 9 जुलैची तारीख देण्यात आली आहे. आज हजर असलेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी तसेच उंची व छातीचे मोजमाप घेण्यात येणार आहे.

मात्र जे उमेदवार पावसामुळे भरती प्रकीयासाठी उपस्थित राहु शकले नाहीत, त्यांची कागदपत्र पडताळणी, उंची व छाती मोजमाप व शारीरीक चाचणीची संपुर्ण प्रक्रीया 9 जुलैला घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे पावसामुळे सर्व उमेदवारांची तात्पुरती थांबण्याची व्यवस्था अकोला पोलिस लॉन येथे करण्यात आली होती.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Mali: प्राजक्ता जणू सौंदर्याची खाण...

Parbhani : आदर्श शेतवाटणी! दोन प्राध्यापक भावांनी शेतकरी भावाला दिला अधिक हिस्सा; मुलांचे शिक्षण व लग्नाचीही घेतली जबाबदारी

Crime News: मुलीच्या छेडछाडीला विरोध केल्याने पित्याला अमानुष मारहाण; पाहा, VIDEO

Stress Relief: फक्त ५ मिनिटांत ताण कमी करण्यासाठी प्रभावी मानसिक उपाय

Maharashtra Live News Update: शिवसेना ठाकरे गटाच्या अखिल चित्रे यांनी मंत्री नितेश राणे यांना डिवचले

SCROLL FOR NEXT