Maharashtra Rain Alert Saam TV
महाराष्ट्र

Rain Forecast : राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय; आज विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा; 23 जिल्ह्यांना यलो अलर्ट

Rain in Maharashtra : नागपूरसह पुणे, अहमदनगर आणि बीडमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.

प्रविण वाकचौरे

Maharashtra rain Alert :

गणेश चतुर्थीपासून राज्यात सक्रीय झालेला पाऊस अनेक भागांत बरसत आहे. नागपूरला काल पावसाने अक्षरश: झोडपून काढलं. नागपूरसह पुणे, अहमदनगर, जळगाव आणि बीडमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.

मॉन्सूनसाठी पोषक स्थिती निर्माण झाल्याने सर्वत्र पाऊस पडत आहे. आज विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर उर्वरित भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. (Latest Marathi News)

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मध्य प्रदेशपासून आसामपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. दक्षिण-मध्य महाराष्ट्र आणि परिसरावर वारे वाहत आहेत. यामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे.

या पार्श्वभूमीवर आज विदर्भ, कोकणात विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातही पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.  (Rain Update

कोणत्या जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट?

राज्यातील ठाणे, पालघर, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे , छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Traffic: मुंबईत तयार होतोय केबल- स्टे ब्रिज, मढ-वर्सोवा दीड तासांचा प्रवास होणार फक्त १० मिनिटांत

Municipal Corporations Election: महापालिकांवर कब्जा, त्याचा मंत्रालयावर झेंडा, 9 महापालिका ठरवणार राज्याचा 'किंगमेकर'

Uddhav- Raj Alliance: ठाकरेंच्या युतीचा मुहूर्त ठरला; भाजप-शिंदेसेनेला टक्कर देण्यासाठी ठाकरे बंधुंची रणनीती काय?

Fact Check : तुमचं व्हॉट्सअॅप हॅक होतंय? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? VIDEO

शिक्षक भरती घोटाळा: आणखी एका शिक्षणाधिकाऱ्याला अटक; 12 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT