Maharashtra Rain Saam tv
महाराष्ट्र

Rain Alert: पुढील २४ तास मुसळधार पावसाचे, पुणे- नाशिकसह ४ जिल्ह्यांना रेड अलर्ट

Maharashtra Rain Update: राज्यात पावसाचा धुमाकूळ सुरूआहेत. पुढचे २४ तास राज्यासाठी महत्वाचे असणार आहे. राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले जात आहे.

Priya More
  • राज्यासाठी पुढील २४ तास महत्वाचे

  • मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा

  • पुणे, नाशिक, धुळे आणि जळगावसाठी रेड अलर्ट

  • नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

राज्यात पावासाचा हाहाकार सुरूच आहे. विदर्भात तुफान पाऊस पडत असून नदी नाल्यांना पूर आला आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला असू जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशामध्ये आता राज्यासाठी पुढचे २४ तास देखील महत्वाचे असणार आहे. पुण्यासह उत्तर महाराष्ट्रात पुढील २४ तासांत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. पुणे, नाशिक, धुळे जळगाव या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पुणे हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राजवळ निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र पश्चिमेकडे सरकल्यामुळे पुढील २४ तासांमध्ये महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. पुढील २४ तासांमध्ये पुण्यासह उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम राहील. मात्र उद्यानंतर पावसाचा जोर कमी होईल.

पुण्यातील घाट माथ्यावर पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर पुणे शहराला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असल्याची माहिती पुणे वेधशाळेने जारी केली आहे. यंदा मान्सून उशिरा दाखल झाला असला तरी पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील अनेक धरणं भरली आहेत आणि ही बाब नक्कीच दिलासादायक आहे. पुढील २४ तासांसाठी उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नाशिक या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे.

दरम्यान, नाशिकमध्ये पावसाचा जोर कायम आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. जिल्ह्यातील नदी-नाल्यांना पूर आला आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाह करण्यात आलं आहे. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. नागपूरममध्ये देखील हिच परिस्थिती आहे. मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

श्रावणात बनवा अळूच्या पानांची कुरकुरीत वडी; एकदा खाल तर खातच राहाल

Cinnamon Water Benefits: सकाळची सुरुवात करा दालचिनीच्या पाण्याने; रिकाम्या पोटी प्यायल्यास शरीराला मिळतील हे ७ फायदे

Maharashtra News Live Update: धुळ्यात वाहन घेऊन जाणाऱ्या कंटेनरला भीषण आग

Worli Fort : मुंबईत असूनही पर्यटकांच्या नजरेआड राहिला वरळीचा किल्ला, 'या' गोष्टी तुम्ही कधी ऐकल्या आहात का?

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय, आजपासून राज्यात सुट्टे तेल विक्रीवर बंदी; नियम मोडाल तर खबरदार

SCROLL FOR NEXT