Rainfall  Saam tv
महाराष्ट्र

Rain Alert: पुढचे ८ तास महत्वाचे! महाराष्ट्रासह १३ राज्यात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस, राज्यात कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात परतीचा पाऊस धुमाकूळ घालत आहे. हवामान खात्याने महाराष्ट्रासह १३ राज्यांना इशारा दिला आहे. या राज्यांसाठी पुढचे ८ तास महत्वाचे असणार आहेत.

Priya More
  • बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले

  • महाराष्ट्रासह १३ राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडणार

  • महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा

  • पुढील ८ तास १३ राज्यांसाठी महत्वाचे असणार

महाराष्ट्रासह देशातील १३ राज्यांमध्ये आज पाऊस धुमाकूळ घालणार आहे. हवामान खात्याकडून या १३ राज्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे त्यामुळे १३ राज्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावेळी ताशी ७५ किलोमीटर वारे वाहण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याने केरळ, राजस्थान, झारखंड, ओडिशा, आंध्रप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, सिक्कीम, महाराष्ट्र, गुजरात, पश्चिम बंगाल, आसाम आणि मेघालयात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. यादरम्यान काही भागांमध्ये ताशी ४० ते ७५ किलोमीटर वेगाने वारे वाहणयाची शक्यता आहे. तसेच अनेक राज्यामध्ये पूरस्थिती निर्माण होऊ शकते. या राज्यातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महाराष्ट्रामध्ये परतीच्या पावसाने जोर धरला आहे. गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांसह नागरिक हैराण झाले होते. पाऊस नसल्यामुळे दुष्काळ आणि पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली होती. पण आता राज्यात परतीचा पाऊस धुमाकूळ घालत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. आज देखील राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. वादळी वारे, ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह राज्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. महत्वाचे म्हणजे विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा जोर जास्त राहिल. या ठिकाणी हवामान खात्याने पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड या तीन जिल्ह्यात पाऊस धुमाकूळ घालण्याची शक्यता आहे. विदर्भातील यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता आहे. याठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने या ठिकाणच्या शेतकरी आणि नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नांदेडमध्ये शॉर्टसर्किटमुळे २ एकर शेतातील ऊस जळून खाक

Tea Or Coffee Drinking Tips: नाश्त्याआधी की नाश्त्या नंतर, सकाळी चहा-कॉफी कधी प्यावी? जाणून घ्या

दुष्काळावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं; शेतकऱ्यांना दिलासा कधी मिळणार?

Automobile Tips : कारमधून सतत पेट्रोल डिझेलचा वास येतोय? 'ही' ६ कारणे वेळीच जाणून घ्या

Veg Non Veg Label: शॅम्पू, टूथपेस्ट आणि साबणवर येणार व्हेज, नॉन व्हेजच लेबल; सरकारचा नवा नियम

SCROLL FOR NEXT