मराठा आरक्षणप्रश्नी संभाजी सेनेचे रेल्वे रोको आंदोलन मराठा आरक्षणप्रश्नी संभाजी सेनेचे रेल्वे रोको आंदोलन
महाराष्ट्र

मराठा आरक्षणप्रश्नी संभाजी सेनेचे रेल्वे रोको आंदोलन

आज लातूर जिल्ह्यातील पानगाव रेल्वे स्थानकावर संभाजी सेनेनं रेल रोको आंदोलन केले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दीपक क्षीरसागर

लातूर - मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आज संभाजी सेनेने मराठवाड्यातील लातूर, परभणी, औरंगाबाद Aurangabad जिल्ह्यात रेल रोको Rail Roko आंदोलनाचा ईशारा दिला होता. त्या अनुषंगाने आज लातूर Latur जिल्ह्यातील पानगाव रेल्वे स्थानकावर संभाजी सेनेनं रेल रोको आंदोलन केले. पानगाव रेल्वे स्थानकावर नांदेड-बेंगलोर एक्सप्रेस रेल्वे रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी पानगाव Pangaon रेल्वे स्थानकावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्यामुळे रेल्वे स्थानकाला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते.

हे देखील पहा -

मोठ्या पोलीस बंदोबस्तामुळे रेल्वे रोखण्यापूर्वीच पोलिसांनी आंदोलकांना बाजूला केलं. यावेळी मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशी जोरदार घोषणाबाजी आंदोलक कार्यकर्ते करीत होते. परिणामी काही काळ रेल्वे थांबली होती. आंदोलन रोखण्यासाठी कालपासूनच पोलीस संभाजी सेनेच्या कार्यकर्त्यांची धरपकडही करीत होते. जर सरकारने मराठा समाजाला मिळालेले आरक्षण दिले नाही तर येत्या काळात यापेक्षा ही उग्र आंदोलनाचा इशारा संभाजी सेनेचे अध्यक्ष सुधाकर माने यांनी दिला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Fort : किल्ला, समुद्र अन् हजारो फ्लेमिंगो; मुंबईतील 'या' ठिकाणाचं सौंदर्य मन मोहून टाकतं!

Diabetes Diet: डायबिटीजच्या रुग्णांसाठी 'ही' भाजी ठरू शकते फायदेशीर; ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी नक्की खा

Maharashtra News Live Update: धुळे सोलापूर महामार्गवर पुन्हा मराठा आंदोलकांनी रस्ता अडवला

सत्ताधारी पक्षातील नेत्याची भररस्त्यात हत्या; कार्यालयात जाताना सहा जणांच्या टोळीने घेरलं अन्...

विंचू आणि साप चावण्यात नेमका काय फरक? पावसाळ्यात या घटना का वाढतात, जाणून घ्या महत्त्वाची माहिती!

SCROLL FOR NEXT