buldhana crime news 
महाराष्ट्र

रामेश्वर उर्फ ट्यूबलाइट पाेलिसांच्या जाळ्यात; यवतमाळात अटक

संजय जाधव

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव रेल्वे पोलिसांनी नवजीवन एक्सप्रेसमध्ये प्रवास करीत असलेल्या रेल्वे प्रवासाचे प्रवासादरम्यान चोरीला गेलेले पाच लाख आठ हजार ६०४ रुपयांचे सोन्याचे दागिने योग्य व तत्परतेने कारवाई करून हस्तगत करण्यात यश प्राप्त केले. याप्रकरणी दोघांना रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

रेल्वेतून प्रवास करताना मोठ्या प्रमाणात प्रवाशांच्या वस्तु किंवा सामानाची चाेरी होत असते. या चो-या उघडकीस buldhana crime news आणायाचे प्रमाण कमी आहे. परंतु लाेहमार्ग पाेलिस तपासात सातत्य ठेवत असल्याने चाेरांना गाठण्यात यश मिळते.

नवजीवन एक्सप्रेस या सुपरफास्ट एक्सप्रेसने प्रवास करणा-या आकाश कुमार यांच्या आई जमुना देवी राजपुरोहित यांच्या बर्थवर पायाजवळ ठेवलेली लेडीज हॅन्ड बॅग पर्स पळवली हाेती. त्यामध्ये सोन्याचे दागिने आणि मोबाईल हँडसेट असा एकूण पाच लाख आठ हजार ६०४ रुपयांचा मुद्देमाल प्रवासादरम्यान झोपेचा फायदा घेऊन अज्ञाताने चोरून नेल्याची तक्रार आकाश कुमार रूपसिंग राजपुरोहित (राहणार विजयवाडा, आंध्र प्रदेश) यांनी शेगाव रेल्वे पोलिस ठाण्यात दिली होती. या तक्रारी वरुन अनाेळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनेचे गंभीर स्वरूप पाहता गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक अजय पानपाटील यांनी करुन मोबाइलच्या ट्रेसिंग नुसार यवतमाळ येथून संशयित आरोपीस अटक केली. त्याच्याकडून मोबाइल व दागिने असलेली पर्स हस्तगत केली आहे.

लोहमार्ग पोलिसांच्या या कामगिरिने सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मुख्य संशयित आरोपी रामेश्वर उर्फ ट्यूबलाइट आणि देविदास राठोड दोघे (राहणार यवतमाळ) यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी अधिक तपास शेगाव लोहमार्ग पोलिस करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gokarna Beach : स्वर्गाहून सुंदर ठिकाणी पार्टनरसोबत जायचंय? मग गोकर्ण बीच ठरेल बेस्ट

Wednesday Puja Tips: बुधवारी गणपतीच्या पुजेमध्ये वापरा 'या' 5 गोष्टी; गणपती बाप्पाचा सदैव राहील आशीर्वाद

Teacher Salary: दीड लाख शिक्षकांवर टांगती तलवार; सोलापूरच्या ३ हजार शिक्षकांचा पगार थांबणार! काय आहे कारण ?

Mumbai Monorail : मोठी बातमी! येत्या शनिवारपासून मोनोरेल ट्रेनसेवा बंद राहणार, कारण?

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट समोर

SCROLL FOR NEXT