Arrest Saam Tv
महाराष्ट्र

Bhandara: समता एक्सप्रेसमधून गांजाची तस्करी; भंडाऱ्यात दाेघांना अटक

ओरिसा राज्यातून नेमका हा कुठून आणला याचा तपास रेल्वे सुरक्षा अधिकारी करीत आहेत.

अभिजीत घोरमारे

भंडारा : ओरिसा राज्यातून मध्य प्रदेशातील बैतुल येथे १२ किलोग्राम गांजा तस्करी करणाऱ्या दोन संशयित आरोपींना जीआरपी रेल्वे पोलिसांनी (railway police) मोठ्या शिताफीने अटक (arrest) केल्याची घटना भंडारा (bhandara) जिल्ह्यात घडली आहे. जीआरपी रेल्वे पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांना तुमसर रोड रेल्वे पोलिसांना स्वाधीन केले. अरविंद गडेकर (वय २८) आणि राजू अमोते (वय ४५) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. (bhandara latest crime news)

रेल्वे जीआरपी धावत्या समता एक्स्प्रेसमध्ये गस्तीवर असताना दोन व्यक्ती त्यांना संशयित हालचाल करताना दिसले. त्यावेळी त्यांची बॅग तपासली असता त्यात त्यांना गांजा आढळला. हा गांजा ओरिसा राज्यातून बैतुल येथे नेत असल्याची कबुली दाेघांनी दिली.

हा गांजा सुमारे १२ किलाेग्रामचा असून रेल्वे पोलिसांनी दाेघांना अटक केली. हा गांजा बैतूल येथे कुठे जात होता. ओरिसा राज्यातून नेमका हा कुठून आणला याचा तपास रेल्वे सुरक्षा अधिकारी करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Khandeshwar Tourism : 'खांदेश्वर'जवळील 'ही' सुंदर पर्यटन स्थळे एकदा फिरा, पावसाळ्यात निसर्गाच्या प्रेमात पडाल

Snake Bite: सापाने दंश केल्यानंतर काय करावं?

राहुल गांधींकडून कार्यकर्त्यांचा विश्वासघात; काँग्रेसच्या महिला नेत्याचे गंभीर आरोप

Breastfeeding Mothers : बालकांना स्तनपान करणाऱ्या मातांसाठी या ५ गोष्टी नक्की कराव्यात, तज्ज्ञ डॉक्टरांनी नेमकं काय सांगितलं?

Maharashtra News Live Update: वसई-विरार महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयावर फेरीवाल्यांचा ठिय्या

SCROLL FOR NEXT